देवउठनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देवउठणी एकादशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. यावर्षी देवउठणी एकादशी आज २३ नोव्हेंबर २०२३ रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या झोपेनंतर जागे होतात, असे सनातन शास्त्रात नमूद केले आहे. या दिवशी जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते. तसेच उपवासही केला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार, आज देवउठणी एकादशीच्या दिवशी अतिशय शुभ योग जुळून आलाय. देवउठणी एकादशीला महालक्ष्मी योगासह, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग जुळून आला आहे. त्यामुळे या शुभ योगांमध्ये येणारी देवउठणी एकादशी ४ राशीच्या लोकांच्या जीवनात सुख, समृध्दी, यश, अपार धन घेऊन येणारी ठरु शकते. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
मेष राशी
या राशीच्या लोकांची नोकरी-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये प्रमोशन आणि पगारवाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होऊ होऊन वैवाहिक जीवनात सौख्य लाभू शकते.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कमाईत वाढ होऊ शकते.
तूळ राशी
तूळ राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात नवे यशाचे मार्ग उघडू शकतात. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला लाभू शकतात. व्यापारी वर्गाला मोठा नफा मिळू शकतो.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात मोठा फायदा मिळू शकतो. अचानक आर्थिक फायदा होणार असल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारु शकते. कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते.