दिवाळीनंतर ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन ! बुध आणि शनिच्या कृपेने मिळू शकतो प्रचंड पैसा
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी मार्गी आणि वक्री होतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता दिवाळीनंतर गुरु आणि शनी मार्गी होणार आहेत.
ज्यामध्ये ४ नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होणार आहेत, तर ३१ डिसेंबरला गुरु मार्गी होणार आहे. या राशी परिवर्तनामुळे ३ राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. तसेच, या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तर या भाग्यवान राशी कोणत्या जाणून घेऊ.
मेष रास:
गुरु आणि शनिदेव मार्गी होणं मेष राशीसाठी फायदेशीर सिद्ध ठरु शकतं. कारण तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या स्थानी शनिदेव तर गुरू लग्न स्थानी मार्गी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला प्रंचड फायदा होऊ शकतो. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकतो. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते.
मिथुन रास
गुरु आणि शनिदेव मार्गी होणं तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतं. कारण शनी तुमच्या राशीतून भाग्य स्थानी तर गुरू थेट ११ व्या स्थानी मार्गी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच अनेक दिवसांपासून रखडलेली कामंही पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात नवीन कामं सुरू केल्याचे नंतर चांगले परिणाम मिळू शकतात. तसेच, या काळात तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे.
सिंह रास
गुरु आणि शनी यांचं मार्गी होणं सिंह राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतं. कारण शनिदेव तुमच्या राशीच्या सातव्या स्थानी तर गुरु तुमच्या राशीतून थेट नवव्या स्थानी मार्गी होणार आहेत. त्यामुळे या काळात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढून तुमच्या जोडीदाराशी सुसंवाद वाढू शकतो.
जोडीदाराच्या सल्ल्याने जे काही काम कराल त्यात यश मिळू शकते. तसेच तुम्हाला भागीदारीच्या कामातही यश मिळू शकते. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासदेखील करू शकता. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ परिणाम देणारा ठरु शकतो.