मित्रांनो नवरात्रीमध्ये जर तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा घटस्थापना करत नसाल तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये हे एक काम नक्की करावे मित्रांनो नवरात्री आणि शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरी येते आणि नऊ दिवस आपल्या घरी राहते आणि दसऱ्याच्या दिवशी देवीचे विसर्जन होते.
मित्रांनो नवरात्रीमध्ये अनेक उपाय केले जातात अनेक पारायण केले जातात. दुर्गा सप्त ऋषीचे पारायण सुद्धा केले जाते परंतु बरेचसे लोक आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतात आणि बरीचशी लोक घटस्थापना करत नाहीत. तुम्ही जर घटस्थापना करत असेल किंवा नसेल तरीही तुम्ही हे एक काम तुमच्या घरामध्ये नक्की करावे.
जर घटाची स्थापना झाली असेल तर घटाच्या समोर हे एक काम करू शकता आणि जर घटस्थापना झाली नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर हे एक काम करू शकता. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक अखंड दिवा लावायचा आहे.
हा अखंड दिवा मोठा असला पाहिजे जो नऊ दिवसांपर्यंत चालेल असा पाहिजे तेलाचा दिवा लावावा त्यामध्ये धाग्याची किंवा दोऱ्याची वात लावावी. मित्रांनो हा दिवा नऊ दिवस अखंड तेवत राहिला पाहिजे असा असावा.
ज्या घरामध्ये नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो त्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येते. मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्ये लावावा हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरात सदैव वास करते.