ग्रह एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार या बदलांचा परिणाम प्रत्येक राशीवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर, शनिवारी होणार आहे. तसेच हा दिवस पितृपक्षातील अमावस्या तिथीचा आहे. तर चार दिवसानंतर नवरात्रीच्या काळात म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्यदेव दुपारी ०१:१८ वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना या काळात अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशींचे भाग्य उजळणार?
वृषभ राशी
ऑक्टोबर महिना या राशींच्या लोकांसाठी खूप खास असू शकतो. सुर्याचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी बंपर लाभ घेऊन येणारे ठरु शकते. कामाच्या नवीन संधी मिळू शकतात. तसेच तुमच्या समस्या संपून काही चांगल्या बातम्याही या काळात तुम्हाला मिळू शकतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने विशेष आर्थिक लाभही होऊ शकतो.
सिंह राशी
सिंह राशींच्या लोकांसाठी सूर्यदेवाचे राशी परिवर्तन प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देणारे ठरु शकते. या दरम्यान तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते. तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळू शकतो. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसायात नफा होऊन या काळात रखडलेला पैसाही मिळू शकतो.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांना या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. या राशीतील लोकांना शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये नफा होऊ शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
मकर राशी
सुर्यदेवाचे गोचर होताच मकर राशींच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांना या काळात चांगले दिवस अनुभवता येऊ शकतात. या काळात जमिनीशी संबंधित प्रकरणे मार्गी लागू शकतात. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येऊ शकते. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. तर प्रशासकीय क्षेत्रातील लोकांची या काळात पदोन्नती होऊ शकते.