मित्रानो,पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी विविध विधी केले जातात. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येपर्यंत पितृपक्ष असतो.
धर्मशास्त्रामध्ये श्राद्धाचे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानुसारच श्राद्ध केल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यासाठी वेळ आणि धनाची आवश्यकता असते परंतु तुम्ही विधीव्रत श्राद्ध कर्म करण्यास सक्षम नसाल तर काही सोपे उपाय करून पितरांना तृप करू शकता. यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर क्रोधीत होणार नाहीत. पितारांनी स्वतः आपल्या प्रसन्नतेसाठी हे सोपे उपाय सांगितले आहेत.
जर श्राद्ध करण्याची इच्छा असणार्या व्यक्तीचे उत्पन्न कमी असेल तर त्याने पितरांच्या श्राद्ध कर्मासाठी यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन सामग्री ज्यामध्ये पीठ, गुळ, साखर, फळ आणि दक्षिणा द्यावी.
जर एखादा व्यक्ती गरीब असेल आणि श्राद्ध करण्याची इच्छा असूनही धनाच्या कमतरतेमुळे करू शकत नसेल तर त्याने पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तर्पण करावे. ब्राह्मणाला एक मुठभर काळे तीळ दान केल्यास पितृ प्रसन्न होतात.
जर एखाद्या व्यक्तीला हे उपाय करणेही शक्य नसेल तर पितरांना स्मरण करून गाईला चारा टाकावा.
एवढेही करणे शक्य नसेल तर सूर्यदेवासमोर हात जोडून उभे राहा आणि प्रार्थना करा, ‘माझ्याकडे पर्याप्त धन आणि साधन नसल्यामुळे पितरांचे श्राद्ध करण्यास मी असमर्थ आहे. यामुळे तुम्ही माझ्या पितरांना माझा आदरयुक्त आणि प्रेमयुक्त नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहचवा आणि त्यांना तृप्त करा.’ या सोप्या उपायांमुळे तुमचे पूर्वज प्रसन्न होतील.