मित्रांनो आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो पण ह्या सेवेमध्ये कुठे तरी काही तरी राहीले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते. काही तरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काही तरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाहीए असे आपल्याला वाटत राहते.
तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपणाला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात. आपल्याला पूजेचे फळ हे मिळतेच परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावे लागतात.
मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण अश्या काही ३ गोष्टी सांगणार आहेत ज्या रोजच्या आपल्या स्वामी पूजनामध्ये करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळणारच.ह्या ३ गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी आपली सेवा सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला मिळेल.
जर तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरु केली असेल तर तुम्ही ह्या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा. मित्रांनो दररोज संध्यकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी ७:३० वाजता किंवा संध्यकाळी ची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावि.
स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत ह्या अध्याचे अध्ययन करावे. अध्ययन करताना दररोज ३ अध्यायन वाचावेत.
कारण त्यात २१ अध्यायने असतात जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्यायने होतील व पुढील आठव्यात पुन्हा नव्याने सुरु करू शकाल. हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचे ११ माळी जप करावा. हे न चुकता रोज करावे.
वरील सांगितलेल्या तीनही गोष्टी झाल्याच पाहिजेत. आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथ दिवा लावावा व अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मानाने करू शकाल. तसेच एका ग्लास मध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे. तसेच अगरबत्तीचा रक्षा आपण व आपल्या घरातील लोकांना लावावी.
अश्या प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी. आपल्या स्वामींच्या पूजनाचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून आपण दररोजच्या सेवेमध्ये ह्या ३ गोष्टी नक्की करा तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरात आपल्या भिंतीवर हे वाक्य नक्की लिहा.