मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपवास पूजा पारायण असे वेगवेगळे उपाय आपण करत असतो. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण कोणताही मार्ग सोडत नाही. कारण स्वामी आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये मदत करतात. त्याच्यामुळे आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी सर्व उपाय करत असतो.स्वामी आपल्याला आपण अडचणीमध्ये असलो तर त्यातून आपल्याला बाहेर ही काढतातच.आपण त्यांच्याजवळ काही न मागता ते आपल्याला सर्व काही देत असतात.
त्याच्यामुळे आपण आपले स्वामींवर जास्त श्रद्धा असते .तर मित्रांनो तुमच्या आयुष्यातील तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतील किंवा अडचणी असेल तर त्या दूर करण्यासाठी तुम्ही स्वामींच्या हा एक उपाय जरूर करून पहा. त्याच्यामुळे तुमची आयुष्य बदलून जाणार आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया कोणता उपाय करायचं आहे.
स्वामींची मनापासून मनोभावाने सेवा केली तर त्यांच्या अनुभव तुम्हाला नक्की येईल. ही सेवा करत असताना ती सेवा स्वामी पर्यंत पोहोचेल. आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे.जी सेवा तुम्ही मनापासून केली विश्वासाने केली श्रद्धेने केली तर आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळेल. जर मनापासून ही सेवा केली तर तरी सेवा कोणती आहे चला तर आता जाणुन घेऊया.
मनापासून स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी सर्व काही देतील.आयुष्यात जे हवं ते सगळं मिळेल. तुम्हाला पारायण करायचे आहे. तर ते कोणते पारायणआहे ते पारायण म्हणजे गुरुचरित्र पारायण करायचा आहे. गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचे पारायण असतं .आणि हे तुम्हाला वर्षभर करायचं आहे. वर्षभर म्हणजे तुम्ही वर्षातून तुमचे सात पारायण पूर्ण व्हायला पाहिजे. अशी ही सेवा वर्षभर करत राहायचे आहे.वर्षभरातून केव्हाही तुम्ही ते सात पारायण करू शकता.
समजा या महिन्यात तुम्ही एक पारायण पूर्ण केलं सात दिवसाचं पुढच्या महिन्यात करा किंवा दोन महिन्यानंतर परत पूर्ण करा एक पारायण असं तुम्ही सात पारायण वर्षातून करायचे आहेत. आणि गुरुचरित्र पारायणाचे अध्याय सात दिवसात पूर्ण होतात. पण गुरुचरित्राचे कठीण नियम असतात त्या नियमांचे पालन करून हे पारायण करायचे असतात.
जर तुम्ही सात दिवसाचे हे पारायण पूर्ण केले. तर मग परत पुढच्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात तुम्ही करू शकतात. परत तिसऱ्या महिन्यात करू शकतात. असं तुम्ही वर्षभरातून सात तुमचे पारायण करायचा आहे.सात पारायण पूर्ण करतो त्याला सगळं काही मिळतं. ते पैसा असेल गाडी असेल बंगला काही असेल तेही त्याच्या मनात असेल त्याही गोष्टीसाठी त्याला मिळून जातात सर्व काही होतं त्याची प्रगती होते आनंद आरोग्य सगळं काही मिळतं. फक्त मनापासून विश्वासाने तुम्हाला करायचा आहे.
हे सात पारायण नियमांचे पालन करूनच झाले पाहिजे. सात दिवस कठीण नियमांचे पालन असतात.खाली झोपायचं असतं एकच भाजी सात दिवस खायची असते. अशा रीतीने हे पारायण पूर्ण केले जाते . हे असे तुम्ही कठीण पारायण केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटीत येणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या तुमचे आयुष्य सुद्धा बदलून जाणार आहे. तर मित्रांनो मी जर तुम्हाला वरती सेवा सांगितले आहे. ते तुम्ही नक्की आवर्जून करायची आहे याचा फायदा तुम्हालाच होणार आहे.