Jio, Airtel आणि Vi ग्राहकांसाठी फायद्याची बातमी! दररोज 4GB पर्यंत डेटा

सध्याच्या या डिजीटल युगात भारतात सरासरी मोबाइल डेटाचा वापर कमालीचा वाढला आहे. Jio च्या ताज्या अहवालात असंही समोर आलं आहे की कंपनीच्या नेटवर्कवरील वापरकर्त्यांनी एका महिन्यात १०० बिलियन पेक्षा जास्त डेटा खर्च केला आहे. जर तुम्ही देखील अशाप्रकारे भरपूर डेटा वापरत असाल तर काही खास प्लान तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. आजकाल १.५० ते २ जीबी डेली डेटा दिवसाला मिळतो. पण अनेकांना हा डेटा पुरत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला Airtel, Reliance Jio आणि Vodafone Idea च्या खास प्लान्सबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये जास्तीत जास्त डेटा दिला जातो.

रिलायन्स जिओ प्रीपेड योजना
रिलायन्स जिओचे असे तीन प्लान आहेत ज्यात दररोज २.५ जीबी मोबाइल डेटा उपलब्ध आहे. या सर्व प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शनही या प्लानमध्ये उपलब्ध आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत ३४९ रुपये आहे. या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. ८९९ रुपयांचा प्लान ९० दिवसांचा आणि २०२३ रुपयांचा प्लान २५२ दिवसांच्या वैधतेसह येतो.

एअरटेल प्रीपेड योजना

जर तुम्ही Airtel वापरकर्ते असाल तर तुम्हाला २.५ जीबी आणि ३ जीबी डेली डेटासह अनेक योजना मिळतील. या सर्व प्लानमध्ये अमर्यादित 5G डेटा, दररोज १०० एसएमएस, अमर्यादित व्हॉईस कॉल, Apollo 24|7 सर्कल मेंबरशिप तीन महिन्यांसाठी, मोफत Hellotunes, Wynk Music आणि Airtel Xstream अॅपवर २८ दिवसांचं सब्सक्रिप्शन यांसारखे फायदेही असतील.

एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता ८२ दिवसांची आहे आणि ती Amazon प्राइम मेंबरशिपसह येते. तुम्ही अधिक वैधता आणि एक वर्षाचा Disney + Hotstar मोबाईल प्लान शोधत असाल, तर तुम्ही ३,३५९ रुपयांचा प्रीपेड पॅक निवडू शकता. या प्लानमध्ये दररोज २.५ जीबी मोबाइल डेटा मिळतो. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. जर तुम्हाला आणखी अधिक डेटा हवा असेल तर तुम्ही ९९९ रुपयांचा खास प्लान निवडू शकता.

या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. पण पॅकची वैधता २८ दिवस आहे. ४९९ रुपयांच्या या पॅकमध्ये ३ जीबी डेली डेटाही दिला जातो. या प्लानची वैधताही २८ दिवसांची आहे आणि यात Disney + Hotstar चे मोबाईल सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. आणखी एख एअरटेलचा प्लान ६९९ रुपयांचा असून या पॅकची वैधता ५६ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. हा पॅक मोफत Amazon प्राइम मेंबरशिपसह येतो.

व्होडाफोन आयडिया प्रीपेड योजना
Vodafone Idea ने अजन देशात 5G सेवा सुरू केलेली नाही. परंतु 4G डेटासह अनेक प्रीपेड योजना कंपनीकडे उपलब्ध आहेत. यात ३९९ रुपयांच्या Vodafone Idea प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. या पॅकमध्ये दररोज अमर्यादित व्हॉइस कॉल्स, १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लानची वैधता ही २८ दिवसांची आहे. जर तुम्ही दररोज २.५ जीबी पेक्षा जास्त डेटा वापरत असाल तर तुम्ही ३५९ रुपयांचा प्लान निवडू शकता.

या पॅकमध्ये दररोज ३ जीबी मोबाइल डेटा उपलब्ध आहे. या पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉल्स ऑफर केले जातात. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. ज्या वापरकर्त्यांना आणखी व्हॅलिडीटी हवी आहे त्यांना ६९९ रुपयांचा पॅक निवडता येईल. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. तसंच ४७५ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या यादीतील हा एकमेव पॅक आहे जो दररोज ४ जीबी डेटासह येतो.

अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Comment