नमस्कार मित्र मैत्रिणींन
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथींना विशेष महत्व आहे. चंद्राच्या वाढण्याने किंवा घटन्याने प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तसेच अमावस्या येत असते. धार्मिकदृष्ट्या या दोन्ही तिथींचे खूपच विशेष महत्त्व आहे.
मित्रांनो तसे करून प्रत्येक महिन्यात अमावस्या येते पण जेव्हा या महिन्यात ही अमावस्या सोमवार येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात. म्हणजे अमावस्या आणि सोमवार हा दुर्लभ योग जेव्हा जुळून येतो तेव्हा त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. आणि यामुळेच ह्या अमावस्याचे महत्व कितीतरी पटींनी वाढते.
सोमवती अमावस्याच्या दिवशी वैभव संपत्ती समृद्धी वैभव हे सर्व प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. जे त्वरित म्हणजे लगेच फळ देणारे असतात त्यामुळे आपण सोमवती अमावस्या दिवशी करायचा असाच एक उपाय पाहणार आहोत.
हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये अशांती असेल तर ती अशांती दूर होईल जर तुम्हाला नोकरी धंद्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा लग्न जुळवणे मध्ये विवाह संबंधी काही अडचणी येत असतील तर त्यादेखील दूर होतील. तुमचे एखादं काम अडले असेल एखादा कार्य संपन्न होत नसेल तर ते देखील पूर्ण होईल.
सोमवती अमावस्या शिवपूजन करण्याचे खूप महत्त्व आहे त्याचबरोबर शिवपूजन आणि पित्तृ पूजन देखील खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये पितृ दोष असेल आणि त्यामुळे तुमची काम होत नसतील तर हा पितृदोष देखील दूर होईल.
तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल.
सोमवती अमावस्या हा अद्भुत योग मानला जातो या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदीमध्ये स्नान करावे आणि त्यानंतर सुर्यदेवांना आणि तुळशी मातेला अर्घ्य द्यावे शिवलिंगावर भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात यामुळे भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहिल.
मित्रांनो या वर्षी सोमवती अमावस्या या वर्षी 11 एप्रिल रविवार रोजी सायंकाळी सहा वाजून 23 मिनिटांनी हे अमावस्या तिथी सुरू आहे त्याचा प्रारंभ होत आहे आणि 12 एप्रिल सोमवार रोजी रात्री आठ वाजता अमावस्या तिथी समाप्त होत आहे.
मित्रांनो आपल्या घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी गरीबी कायमची नष्ट करण्यासाठी एक खास उपाय जे तुम्हाला सोमवती अमावस्या ला करायचा आहे त्याबद्दल माहिती आज आपण पाहणार आहोत.
या दिवशी आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मीचा सदैव निवास राहील. आपल्या घरात पैसा आहे तो अनेक मार्गांनी येऊ लागेल आणि तो सुद्धा करून पैसा कमावतो घरात पैसा टिकत नाही वायफळ खर्च होऊन आपल्या घरातील पैसा निघून जातो तर आपल्या घरात पैसा यावा आणि तो टिकून राहावा यासाठी आपल्याला सोमवती अमावस्या ला एक उपाय करायचा आहे.
या दिवशी सायंकाळी आपल्याला तुळशीला 108 प्रदक्षिणा घालायची आहे म्हणजेच सूर्यास्त होत असताना आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे.
हा दिवा प्रज्वलित केल्या मुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होते माता तुळशीला धूप दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेभोवती आपल्याला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
मित्रांनो हा उपाय इतका प्रभावशाली आहे की आपण केल्यामुळे काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल तुमच्या घरामध्ये अनेक मार्गांनी पैसा येऊ लागेल. तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्याल.
मित्रांनो प्रदक्षिणा घालत असताना तुमच्या आवडीचा मंत्र म्हणजे तुझी तुमची इस्टदेवता मंत्र आहे त्या देवतेचा मंत्रजाप तुम्ही बोलत राहा. मंत्रजप करीत राहा. यामध्ये तुम्ही गायत्री मंत्र, ओम नमः शिवाय मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जो मंत्र तुम्हाला प्रिय असेल तो म्हणायचा आहे आणि तुळशीमातेभोवती 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
हे झाल्यानंतर माता तुळशीला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनात ज्या काही आर्थिक अडचण आहेत त्या दूर होऊ देत, मला जीवनात सफलता प्राप्त होऊ दे.
शास्त्रांमध्ये सांगितलेला हा रामबाण उपाय आहे आणि हा उपाय गरिबी दूर करण्यासाठी, दरिद्रता नष्ट करण्यासाठी धन प्राप्त करण्यासाठी सांगितलेला आहे.
तुम्हाला पैशासंबंधी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. अशा रीतीने केलेले उपाय अत्यंत प्रभावशाली असतात. हे उपाय केल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये फार मोठे बदल झालेले दिसून येतील. कारण त्यांना शास्त्रांचा आधार आहे.
हे उपाय शंभर टक्के परिणामकारक असतात. त्यामुळे तुमच्या जीवनात पैशासंबंधी अडचणी असतील तर तुम्ही सोमवती अमावस्येला हा उपाय अवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा आणि आमच्या पेज ला लाईक करा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्रोतांच्या धारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.