22 मार्च : चैत्र नवरात्र, नवीन वर्ष गुढीपाडवा: कुलदेवीची ‘अशी’ भरा ओटी: नव्या वर्षात काहीच अडणार नाही

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो 22 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. या दिवशी मराठी नव वर्षाची सुरुवात होणार आहे. याच दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस आहे. आणि याच दिवसापासून चैत्र महिन्यातील चैत्र नवरात्र उत्सव म्हणजेच नवरात्रीचे नऊ दिवस सुरू होणार आहेत.

या अशा अनेक कारणांनी या दिवसाला खूप सारे महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी गुढी पाडवा असल्याने तसेच चैत्र नवरात्रातील पहिला दिवस असल्याने आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असे म्हणणारा हा दिवस असल्याने या दिवशी अनेक शुभ कार्यांचा चांगला योग देखील आहे.

अशा या दिवसाचा आपल्याला चांगला उपयोग करून घेऊन चांगल्या वस्तू दागदागिने घर बंगला गाडी अशा वस्तु तर खरेदी करता येतीलच. मात्र याच बरोबर एक उपाय देखील करता येईल की ज्यामुळे आपल्या घरात भरभराटी येईल सुख समृद्धी नांदेल यश नेहमीच तुमच्या पदरी पडेल.

चला तर मित्रांनो काय आहे हा उपाय किंवा तोटका तो जाणून घेऊया..

मित्रांनो चैत्र पाडवा या दिवशी नववर्षाच्या बरोबरच नवरात्राला देखील सुरुवात होणार आहे. आणि नवरात्र म्हणजे देवीचा सण हे नऊ दिवस देवीचे असतात. म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या कुलदेवता मातेची म्हणजेच अंबाबाई, यल्लमा, महालक्ष्मी, मरीआई, अशा प्रकारच्या ज्या माता असतील ज्या आपल्या कुलदैवताच्या असतील त्यांची ओटी भरावी.

ओटी भरताना छानस हिरवे कापड किंवा साडी, गहू किंवा तांदूळ, नारळ, सुपारी असे सर्व साहित्य घेऊन भरगच ओटी भरावी. ओटीत अकरा रुपयाची दक्षिणा ठेवावी.म्हणजेच घरच्या घरी ओटी भरताना एका ताटामध्ये हि ओटी भरून आपल्या घरातील देव्हाऱ्याजवळ किंवा जिथे माता किंवा देवीचा फोटो असेल प्रतिमा असेल त्याठिकाणी ही ओटी ठेवायची आहे.

ही ओटी या दिवशी दिवसभर येथे ठेवायचे आहे. त्यानंतर रात्रभर देखील येथे ठेवायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी या बोटीतील जी साडी किंवा कापड असेल ते घरच्या प्रमुख महिलेने स्वतःसाठी वापरावे तसेच याच्या ती नारळ घरातील गोड जेवण किंवा नैवेद्य बनवताना वापरावा.

आणि कोटीतील जी दक्षिणा आपण ठेवला होता ती आपण पैसे ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी तशीच पुढे बांधून ठेवून द्यायचे आहे. यामुळे आपल्या घरात पैशाला पैसा जोडला जाईल बरकत येईल.

नव वर्षाच्या सुरुवातीलाच आणि नवरात्रीच्या सुरुवातीला आपण हा तोटका करत असल्याने साहजिकच आपली माता आपल्यावर प्रसन्न होईल. माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल आणि आपणाला निश्चित असे यश मिळत राहील.

नव्या वर्षात आपली नोकरी मध्ये बढती होईल, व्यवसाय मध्ये चांगली वाढ होईल. येणारा पैसा चौपट वाढून येईल. घरात नेहमी सुख समृद्धी शांती राहील.

ही ओटी विवाहित स्त्रियांनीच भरावी. ही मुख्य गोष्ट लक्षात ठेवावी. ओटी भरून पूजा करताना मनोभावे प्रार्थना करावी मनोभावे नमस्कार करावा. आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या संस्थांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. त्याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *