शनिवारी मुलांवरून ओवाळून ‘ही’ एक वस्तू छतावर ठेवा : मुलांची चिडचिड, आजार कमी होईल : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो मुले चिडचिड करायला लागली किंवा आजारी पडली की आपल्या सर्वांचा जीव कासावीस होतो. घरांमध्ये देखील किरकिर वाढते. यासाठी या मुलांची चिडचिड तसेच आजारपण कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

मित्रांनो जर आपल्या घरातली मुलं अभ्यासात लक्ष देत नसतील सारखी चिडचिड करत असतील, त्रास देत असतील, नेहमी आजारी राहत असतील तर तुम्हीसुद्धा दर शनिवारी हा एक उपाय नक्की करावा अमावस्या च्या दिवशी हा उपाय नक्की करावा.

यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या मुलांवरून ओवाळून ही एक वस्तू तुमच्या घराच्या छतावर ठेवायची आहे. त्यामुळे तुमच्या मुलांवर कोणतेही संकट येणार नाही. जी वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती असेल ती सुद्धा निघून जाईल आणि मुलं सुखी होतील. त्यांना त्याचा भरपूर लाभ होईल.

तुम्हाला कोणता उपाय, कोणती वस्तू मुलांवर ओवाळायची आहे? तर मित्रांनो शनिवारी सकाळी 12 वाजायच्या आत थोडासा भात शिजवून घ्यावा. भातात मीठ अजिबात टाकू नये. फक्त पाणी आणि तांदूळ घ्यावे.

एकदम थोडासा एक वाटी भात आपल्याला हवा आहे. या हिशोबाने तो भात तुम्हाला शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ, तेल काहीच टाकायचं नाही. फक्त पाण्यामध्ये तांदूळ टाकून तो भात शिजवायचा आहे.

त्यानंतर तो भात झाल्यानंतर एका वाटीत काढून घ्यायचा. भात काढल्यानंतर तो भात आपल्या मुलांना खाली बसवून, त्यांची तोंड पूर्व दिशेकडे करून, त्यांच्यावरून हा भात सात वेळेस ओवाळून घ्यावा.

त्यानंतर तो भात तुमच्या छतावर ठेवून द्यावा. चिमणी, कावळा यांसाठी पक्षांसाठी तो भात ठेवून द्यावा. यांने तुमच्या मुलांवरची सगळी वाईट शक्ती, जो काही त्यांना त्रास आहे तो निघून जाईल. आणि ते सुखी होतील. त्यांचे भविष्य सुखी होईल. त्याच्यावर कोणते संकट येणार नाही.

मित्रांनो शनिवारी हा एक उपाय नक्की करा. तुम्हालाही आपल्या मुलांमध्ये चांगले काही गुण येताना दिसून येईल तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या पेजला शेअर करायला विसरू नका.

वरील माहितीही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोषातून तसेच वेगवेगळ्या शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *