गुरुचरित्राचा अध्याय रोज का वाचावे ? वाचनाचे फायदे : पाळावयाचे नियम !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो, गुरुचरित्राचा अध्याय रोज केलाने त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच होतात. ज्याप्रमाणे प्राणि मात्रांना रोज जगण्यासाठी अन्न, पाण्याची गरज असते. त्याप्रमाणे रोज गुरुचरित्राचे पारायण करावे. त्यामुळे आपली उन्नती ही निश्चित होते.हे पारायण केल्याने तुमच्या जीवनात खूप कसे बदल झालेले तुम्हाला दिसून येतील. गुरूचरित्र हा ग्रंथ खूप श्रेष्ठ मानला जातो.

गुरुचरित्राचे पारायण करताना काही नियम लक्षात घेऊनच तसे पारायण करावे. महिलांना येणारी मासिक पाळी या वेळेत गुरुचरित्राचे पठण करू नये. त्याचबरोबर जर तुमच्या घरात सुतक असेल तरीदेखील चरित्राचे पारायण करू नये. गुरुचरित्राचा 14 वा अध्याय रोज तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही सतत आजारी पडत असेल तर गुरुचरित्रातील 14 वा अध्याय याचे पठण केलाने गुरुमाऊलींचे कृपा तुमच्यावर राहून तुमचे आजार नक्कीच बरे होते.

मित्रांनो, गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जर तुम्ही रोज पठण केले. तर तुमच्या ज्या काही इच्छा, आकांशा असतील त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर गुरुमाऊलींचे कृपा तुमच्यावर कायम राहील. गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. त्याच बरोबर कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची शक्ती ही गुरुकृपेने आपल्याला मिळते.

तुमच्या घरात भरभराटी होऊन अन्नधान्यांना कधीही कमतरता भासणार नाही. तुमच्या घरावर कोणतेही संकट येणार नाही. कोणाची तरी वाईट दृष्टी असेल तर ती ही नष्ट होईल.

गुरुचरित्र या ग्रंथामध्ये गुरुमाऊलींनी कशाप्रकारे संकट दूर केली आहे. त्याच बरोबर त्यांची अनुभव व त्यांचे लीला यामध्ये सांगितलं आहेत. त्याचबरोबर गुरुमाऊली भक्तांची इच्छा कशा प्रकारे पूर्ण करतात. संकटाच्या काळात भक्तांना त्या संकटातून कशाप्रकारे बाहेर काढतात. हे देखील या ग्रंथामध्ये सांगितले आहे.

अशा प्रकारे गुरुचरित्राचे पारायण किंवा रोज पठण केले तर आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोणत्याही संकटांना सामोरे जावे लागणार नाही व आपल्या कुटुंबावर सदैव गुरुमाऊलींचे कृपा दृष्टी राहिली. घरातील वातावरण सकारात्मक होऊन, घरात शांतता, सुख, समृद्धी नांदेल.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *