ज्या महिलांच्या अंगावर दिसतात ‘ही’ लक्षणे : साक्षात महालक्ष्मीची कृपा असते त्या महिलांवर, घरासाठी ठरतात मोठ्या भाग्यवान !

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो,

मित्र- मैत्रिणींनो, ज्या महिलांच्या अंगावर दिसतात ही लक्षणे त्यांच्यावर साक्षात महालक्ष्मीची कृपा असते. अशा महिला ज्या घरात असतात ते घर ठरते मोठे भाग्यवान!
 
स्त्रीशिवाय घराची काय तर आपण या सृष्टीची कल्पनाही करू शकत नाही. असे म्हणतात की घराला स्वर्ग बनवायचे की नर्क बनवायचे हे स्त्रीच्या हातात असते. आणि ते खरेही आहे.
 
मित्र- मैत्रिणींनो, घरातील सुख-समृद्धी प्रसन्नता पवित्रता मुख्यतः घरातील स्त्रीवर अवलंबून असते. महिला घराची गरज आहे आणि त्यांच्या शिवाय घर हे घर वाटत नाही.
 
महिलांमुळे घराला शोभा उत्साह असतो. विवाह हे असे बंधन आहे की ज्यात एक स्त्री व एक पुरुष जन्मजन्मांतरीच्या एका धाग्याने बांधले जातात. विवाहापूर्वी प्रत्येक स्त्री व पुरुषांमध्ये आपल्या जोडीदाराबद्दल काही कल्पना  असतात. काही अपेक्षा असतात.
 
ज्या वेळेस स्त्री च्या आपल्या भावी जोडीदाराकडून अपेक्षा असते की आपला भावी जोडीदार हा आपली काळजी घेणारा असावा, त्याने आपले संरक्षण करावे, आपल्यावर भरभरून प्रेम करावे आणि आपल्याला एका सुरक्षित जीवनाची हमी द्यावी.
 
जेव्हा पुरुष आपल्या भावी जोडीदाराकडून  विचार करतात त्यावेळी त्यांची अपेक्षा असते की, त्यांच्या पत्नीने त्यांचे घर सुख, समाधान व समृद्धीने भरून द्यावे.
 
तिने घरात घेऊन आपल्या घराला स्वर्ग बनवावे. ती सद्गुणी व सदाचारी असावी. तसेच चरित्रवान आणि पतीव्रता असावी. मोठ्यांचा आदर मानसन्मान करणारी तर लहान वर प्रेम करणारी असावी.
 
परंतु विवाहापूर्वी आपण कोणाचा स्वभाव ओळखू शकत नाही. आपल्याला हे समजू शकते की कोणती स्त्री गुणवान व भाग्यशाली आहे ते. समुद्र शास्त्रांमध्ये स्त्रियांच्या शरीराच्या काही गुणांचे वर्णन केलेले आहे.
 
यावरून आपण त्या मुलीचा स्वभाव गुण, अवगुण व भाग्य याविषयी जाणून घेऊ शकतो.
 
चला तर जाणून घेऊया समुद्र शास्त्रानुसार भाग्यशाली स्त्रीची कोणती लक्षणे आहेत ते ?  सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दाट, काळे, लांब केस व काळेभोर असतात अशा स्त्रिया जास्त भाग्यशाली असतात.
 
आपण देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती पाहतो की देवीचे केस लांब, दाट काळेभोर असतात. हे सुख-समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक आहे म्हणून अशा स्त्रियांना जीवनात सुख-समृद्धी संपन्नता मिळते. अशा स्त्रीशी लग्न करणारी पुरुष जीवनात नेहमी प्रगती करतात
 
दुसरी गोष्ट म्हणजे गोल चेहरा व चमकदार मोठमोठ्या डोळ्यांच्या स्त्रीला दयाळू समजली जाते. अशा स्त्रिया आपल्या पतीला कधीच फसवत नाही धोका देत नाहीत.

अशा स्त्रिया लग्न करून ज्या घरात जातात त्या घरात कधीही भांडण तंटे व वाद विवाद होत नाहीत. त्यांचा आगमनामुळे कुटुंबातील सर्वांचेच भाग्य उधळते.
 
तिसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रियांचे कपाळ उंच असते व ज्यांची त्वचा स्निग्ध आणि चमकदार असते अशा उत्तम भाग्यशाली असून आपल्या कुटुंबाचे कल्याण करतात.
 
चौथी ज्या स्त्रियांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया भाग्यशाली असतात आणि पूर्ण जीवन सुख समृद्धीत व्यतीत करतात.  या महिलांमुळे त्यांच्या दोन्ही घरात म्हणजेच सासरी व माहेरी दोन्ही ठिकाणी सुखसमृद्धी येते.
 
मित्र- मैत्रिणींनो, यातील पाचवी गोष्ट या महिलांचे दात पांढरे शुभ्र व सरळ रेषेत असतात तसेच वरच्या पुढील दोन दातांमध्ये गॅप-फट असेल, जीभ पातळ व लाल गुलाबी रंगाची  असते व ओठांवर तीळ असतो अशा स्त्रीया भाग्यशाली असतात व आपल्या कुटुंबाचे सर्व काही नीटनेटके करतात
 
सहावी गोष्ट जास्त यांची मान लांब व पातळ असते अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात अशा स्त्रियांची विवाह करणाऱ्या पुरुषांची व्यापार-व्यवसायात प्रगती होते आणि कोणत्याही कार्यात तो अयशस्वी होत नाही.
 
सातवी गोष्ट ज्या स्त्रियांचे खांदे पुढच्या बाजूला झुकलेल्या असतात, हात लांब असतात व तळहात मऊ आणि गुलाबी रंगाचे असतात.

बोटे लांब व सुंदर असतात अशा स्त्रियांच्या हाता वरूनच त्यांच्या सौभाग्याची ओळख पटते अशा स्त्रिया मोजून-मापून खर्च करतात आणि अशा स्त्रिया पैशांची बचत करतात पतीच्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देतात
 
आठवी गोष्ट ज्या स्त्रियांचे पाय लांब असतात तळपाय सुंदर व पंजे वक्राकार असतात पायाची बोटे जवळजवळ असतात व तळवे मऊ असतात अशा स्त्रियांना साक्षात देवी लक्ष्मी स्वरूप मानले जाते. कारण पुराणात असे पाय साक्षात देवी लक्ष्मीची आहेत.
 
आणि शेवटची नववी गोष्ट ज्या स्त्रियांची बेम्बी गोल, मोठी व खोल असते तसेच बेंबीवर किंवा बेंबीच्या आसपास तीळ अशा स्त्रिया सौभाग्य शाली असतात तिचा सौभाग्यमुळे घरात सुख समृद्धी येते. तसेच कुटुंबाचे भाग्य उजळते.
 
मित्रांनो या गुणांवरून आपण कोणत्या भाग्यशाली स्त्रीला ओळखू शकतो.
 
वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
 
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *