नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो यंदा 28 जानेवारी रोजी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी-कुंकू समारंभ रथसप्तमीदिनी समाप्त होत असते. सप्तमी तिथी भगवान सूर्याला समर्पित आहे. असे मानले जाते की, सूर्य सात पांढरे घोडे काढलेल्या रथावर बसलेले आहेत. माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमी ही रथ ‘सप्तमी किंवा माघ सप्तमी’ म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की, रथ सप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवांनी संपूर्ण जगाला ज्ञान देण्यास सुरुवात केली, याचा अर्थ भगवान सूर्याचा जन्मदिवस देखील मानला जातो.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी सूर्यदेवतेची आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची पूजा आणि सेवा नाम जप आपण अगदी मनापासून या दिवशी केली तर यामुळे मित्रांनो यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला अनेक फायदे होतातच त्याचबरोबर आपल्यावर आलेल्या अनेक संकटांपासून ही लक्ष्मी माता आपली मदत करत असते तर मित्रांनो या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सूर्यदेवतेची आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची विशेष सेवा नक्कीच केली पाहिजे या सेवेमध्ये सर्वात आधी सूर्यदेवतेला आपल्याला जल अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा आणि सूर्यदेवतेचा नाम जप सुद्धा आपल्याला करायचा आहे.
म्हणजेच मित्रांनो या दिवशी आपल्याला या दोन्ही देवतांच्या एखाद्या तरी मंत्राचा दिवसभरातून किमान एक वेळा घरी किंवा सकाळच्या वेळी देवपूजा करताना करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो लक्ष्मी मातेला आपल्याला एक विशेष नैवेद्य सुद्धा या दिवशी दाखवायचा आहे आणि मित्रांनो यासंबंधीचा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर लक्ष्मी मातेला विशेष नैवेद्य दाखवायचा आहे की ज्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तिचे आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुद्धा बरकत होईल तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय आणि हा उपाय करताना कोणता नैवेद्य आपल्याला लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता पण जाणून घेऊया.
तुम्हा सर्वांना माहीतच असेल की, लक्ष्मीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पेढे याचा नैवेद्यही दाखवू शकता. तसेच मित्रांनो मी जो नैवेद्य सांगणार आहे तो नैवेद्य आहे तांदळाची खीर किंवा गव्हाची खीर. मित्रांनो लक्ष्मी मातेला दुधाने बनवलेली खीर अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची खीर याचा नैवेद्य आपल्याला या रक्त सप्तमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये अवश्य बनवायची आहे आणि त्याचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे.
ज्या लोकांना घरात खीर करू शकत नाही, अशा व्यक्तींनी एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यात साखर घालून ते एकजीव करून त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. पण जे लोक खिरीचा नैवेद्य करू शकतात त्यांनी खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे.हा नैवेद्य दाखवल्याने माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहून लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहील. तिचा वास आपल्या घरामध्ये असल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला येणार नाहीत आणि तसेच अनेक प्रकारच्या जर अडचणी तुमच्या घरामध्ये असतील तर त्यातून मुक्तता देखील लक्ष्मीमाता करतील. तर मित्रांनो लक्ष्मी मातेला आवडणारा हा खिरीचा नैवेद्य तुम्ही रथ सप्तमीच्या दिवशी नक्की दाखवा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.