रविवारी गाईला खाऊ घाला ‘ही’ एक वस्तू : तुमचं घराचं स्वप्न होईल लवकर पूर्ण !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो स्वतःच हक्काचं घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुम्ही सध्या भाड्याच्या घरात राहात असाल आणि तुमचं स्वतःच घर घ्यायचं स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही खूप कष्ट देखील करत असाल मात्र घर बांधण्यामध्ये, विकत घेण्यामध्ये अनेक अडचणी येत असतील तर हा विशेष असा ज्योतिष उपाय तुम्ही रविवारच्या दिवशी नक्की करा आणि उपाय अत्यंत साधा आणि सोप्पा आहे. गोमातेला एक वस्तू जर रविवारच्या दिवशी खाऊ घातलीत आणि तिचे आशीर्वाद जर मिळवलेत तर तुमच हक्काचं घर घेण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.

मित्रांनो काही जणांच्या कुंडलीमध्ये भूमिसुख लिहिलेलं नसत. म्हणजे काय तर त्यांचं स्वतःच असं घर ते घेऊ शकणार नाही असे कुंडलीमध्ये असते, त्यांना सतत भाड्याच्या खोलीत राहावे लागते. आपल्या कुंडलीत काही ग्रह अशुभ स्थानी असल्यामुळे असं घडून येत आणि जर आपल्या कुंडलीमध्ये मंगळ हा नीच स्थानी असेल, सूर्य कमजोर असेल किंवा मंगळ आणि सूर्य या ग्रहांवर जर एखाद्या पापी ग्रहाचा जस कि शनी, राहू, केतू यांचा जर अनिष्ट प्रभाव असेल तर या सर्व कारणांमुळे आपल्याला आपलं हक्काचं घर मिळत नाही किंवा घेणे शक्य होत नाही.

बऱ्याच लोकांकडे पैसा असून देखील घर बांधण्यात किंवा घेण्यात अडचणी येत राहतात. कुंडलीमध्ये भूमीसुख नसल्यामुळे हे घडत असत. आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत जो उपाय केल्याने मंगळ आणि सूर्य ग्रह हे मजबूत होतील आणि घर घेण्यामध्ये कोणत्याही अडचणी किंवा समस्या येणार नाहीत आणि सर्वप्रथम लक्षात घ्या हा उपाय आपल्याला सलग 21 रविवार करायचा आहे. यासाठीची विधी पुढीलप्रमाणे. रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून ताज्या पाण्याने स्नान करून सकाळी 9 च्या आत सृयाला अर्घ्य अर्पण करायचं आहे . लक्षात ठेवा सकाळी 9 च्या आतच करायचं आहे.

त्यासाठी एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे आणि या तांब्यात गंगाजल घ्यायचं आहे. गंगाजल म्हणजे कोणत्याही नदीचं पाणी घेऊ शकता. त्यानंतर न तुटलेले तांदूळ आपण या गंगाजलात टाकायचे आहेत तसेच लाल रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाकायच्या आहेत आणि जर गुलाब नसेल तर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या सुद्धा चालतील. तेही नसेल तर चिमूटभर कुंकू देखील या पाण्यात टाकू शकता. त्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा आपण या तांब्यात टाकायचा आहे. नंतर पूर्वेकडे तोंड करून हात जेवढे उंच करता येतील तेवढे करून सूर्यदेवाकडे पाहत आपण हे जल अर्पण करायचं आहे.

लक्षात ठेवा आपली नजर सूर्यदेवाकडे असायला हवी. हे जल अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा सात्यत्याने उच्चार करायचा आहे आणि पाणी अर्पण करताना ते पाणी पायावर तर पडत नाही ना याची काळजी आपण घ्यायची आहे. अशाप्रकारे अर्घ्य केल्यानंतर सूर्यदेवाला नमन करून स्वयंपाक घरात बनवलेली पहिली भाकरी घ्यायची आहे त्यात गूळ मिसळून कोणत्याही गाईला ती चारायची आहे आणि जर गाय देशी असेल तरी चालेल, गावठी असेल तर उत्तमच आणि लाल रंगाची असेल तर त्याहून उत्तम. लक्षात घ्या गो मातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. लक्षात ठेवा गूळ मिक्स केलेली भाकरी गाई समोर फेकायची नाहीये.

आणि स्वतःच्या हाताने तिला भरवा. भाकरी चारतांना मनामध्ये श्रद्धा भाव असुद्या. त्यानंतर गो मातेला हात जोडून नमस्कार करा. आपल्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी प्रार्थना करा. गोमातेच्या पाठीवरून हात फिरवा आणि मित्रांनो हा साधा सोप्पा उ पाय केल्याने आपल्याला दिसून येईल कि आपलं घराचं स्वप्न हे हळू हळू पूर्ण होत आहे. घर बांधताना जर आर्थिक अडचणी येत असतील तर या अडचणी सुद्धा दूर व्हायला मदत होईल. कर्ज काढून तर घराचं स्वप्न बघत असाल तर ते कर्ज सुद्धा लवकरात लवकर फिटून जाईल.

मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जर लोन घेतले असेल तर जोपर्यंत लोन फिटत नाही तोपर्यंत हा उ पाय तुम्ही सातत्याने करत राहा. सूर्यदेवाला रोज सकाळी अर्घ दिल्याने समाजात तुम्हाला मान सन्मान मिळतो , यशोप्राप्ती होते. आणि तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तर दुर्भाग्यच रूपांतर सौभाग्यात बदलन्याची ताकद या उपायात आहे. तुमची इच्छा शक्ती प्रबळ बनवण्याचं काम हा उपाय करतो. एखाद्याला सुख संपत्ती मध्ये वाढ करायची असेल कोणाचे विवाह जुळत नसतील तरी सुद्धा हा उपाय काम करतो तर मित्रानो हा उपाय नक्की करा. तुमचं घराचं स्वप्न नक्की पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. कमेंट मध्ये जय गोमाता, ओम सूर्याय नमः असे लिहायला अजिबात विसरू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *