दत्त जयंती येईपर्यंत 1 वेळेस तरी ‘हे’ एक काम केल्यास : मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो दत्त जयंती येईपर्यंत एकदा तरी हे एक काम आपण केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, आपल्या प्रयत्नांना यश मिळेल, तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये बक्कळ नफा, फायदा तुम्हाला मिळेल. याचबरोबर आपला संसार देखील सुखी होईल.

मित्रांनो आपणाला माहिती आहे की स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, गुरूंचा प्रकट दिवस याला खूप सारे महत्व आपण सारे सेवेकरी मंडळी, भक्त मंडळी देत असतो. या सर्व दिवसांना विशेष असे महत्त्व देखील असते. स्वामींच्या आघात लिला आपण जाणतो. त्यामुळे आपण सदैव स्वामींच्या चरणी नतमस्तक असतो सेवा करत असतो.

तसेच वर सांगितलेल्या प्रत्येक विविध दिवसांसाठी मोठ्या भावाने पूजा आपण करत असतो. मित्रांनो स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा याचबरोबर दत्त जयंतीला देखील विशेष महत्त्व असते. दत्त जयंती निमित्त स्वामींची ही आपण विविध प्रकारे सेवा करत असतो. स्वामींचे आशीर्वाद ही आपणास लाभत असतात.

तर मित्रांनो यंदाची दत्त जयंती 7 डिसेंबर रोजी आली असून दत्त जयंती येण्यापूर्वी आपण स्वामींचे हे काम केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. मात्र स्वामींची हे काम आपण अगदी मनोभावे श्रद्धेने पूर्ण केले पाहिजे. चला तर मित्रांनो पाहू कोणते आहे ते काम…

मित्रांनो 7 डिसेंबर रोजी येणाऱ्या दत्त जयंती पूर्वी आपण स्वामींचे जे एक काम करायचे आहे ते म्हणजे आपणाला गुरुचरित्र पारायण एकदा तरी वाचून पूर्ण करायचे आहे. गुरुचरित्र पारायण करण्यास काही नियम असतात या नियमांमुळे किंवा वेळेच्या अभावामुळे आपणाला हे गुरुचरित्र पारायण करता येत नसल्यास आपण स्वामी चरित्र हे तरी एकदा करावी.

यामध्ये आपणाला 21 अध्याय असतात. त्याप्रमाणे दत्त जयंती येईपर्यंत राहिलेल्या सात दिवसांमध्ये आपण रोज तीन याप्रमाणे अध्याय वाचून पूर्ण केल्यास आपले स्वामी चरित्र पूर्ण होऊ शकते. आणि हे स्वामी चरित्र पारायण वाचण्यासाठी फारसे विशेष काही नियम अथवा वेळेचे बंधन नसते.

तर मित्रांनो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी 7 डिसेंबर रोजी येणाऱ्या दत्त जयंती पूर्वी गुरुचरित्र पारायण किंवा स्वामी चरित्र एकदातरी वाचून पूर्ण करावे. याचा लाभ आतापर्यंत अनेकांनी घेतला आहे आपण देखील एक वेळ हे काम करून स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेऊ शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *