मार्गशीर्ष महिन्यात देवघरात महालक्ष्मीचा कळस नक्की भरा, लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर पैसा यावा त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचे या व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. यंदा 2022 मध्ये मार्गशीर्ष महिना 24 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे आणि योगायोग म्हणजे हा दिवस गुरुवार असल्यामुळे या महिन्याचा पहिला गुरुवार हा 24 नोव्हेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरु करावे.

तर मित्रांनो आज आपण याच मार्गदर्शन महिन्यामध्ये केला जाणार आहे का अत्यंत महत्त्वाच्या पूजेविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ही पूजा म्हणजे आपल्या देवघरांमध्ये महालक्ष्मीच्या नावाने आपल्याला एक कलश स्थापन करायचा आहे मित्रांनो हा कलर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी स्थापन करायचा आहे. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात, कलशाशिवाय कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा अपूर्ण मानली जाते. याच कारणामुळे प्रत्येक उपासनेमध्ये तुम्हाला अमृत स्वरूपात पाणी भरलेले मंगल कलश नक्कीच दिसेल. असे मानले जाते की कोणताही धार्मिक-कलश स्थापन करताना आध्यात्मिक कार्य करणे, ते काम सहजतेने पूर्ण होते आणि त्यात यश प्राप्त होते.

तर मित्रांनो आपल्याला हा कलश या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशीच भरायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये कुलदेवताच्या नावाचा एखादा कलश असेल तर तो कलश सोडून तुम्हाला आणखी एक कलश महालक्ष्मीच्या नावाचा भरायचा आहे. कलश करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रकारचे साहित्य लागणार आहे, मित्रांनो हा कलश तयार करण्यासाठी एक तांब्याचा तांब्या, नारळ, आंब्याचे पान, एक सुपारी आणि एक नाणे बस एवढेच साहित्य तुम्हाला कलश भरण्यासाठी लागते. यासाठी तुम्हाला आधी कलश स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. त्यावरती स्वस्तिक काढायचे आहे, नंतर त्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरून त्यामध्ये सुपारी हळद व पैसा टाकायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला त्या कलशावर ती विड्याचे किंवा आंब्याचे पाने लावायची आहे आणि त्या पानांवर तुम्हाला न सोललेले नारळ ठेवायचे आहे. त्यानंतर तो कलश तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुठेही ठेवायचा आहे. जेथे तुमच्यासाठी सोयीस्कर जागा असेल तेथे तो कलश तुम्ही ठेवू शकता आणि कलश ठेवल्या नंतर त्या कलशाची ओवाळणी करायची आहे आणि त्यानंतर कलशाला अष्टगंध व हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची. आणि त्यानंतर देवाला प्रार्थना करायची की, हे लक्ष्मी माता आमच्या घरा वरील सर्व संकटे बाधा दुर कर. आमच्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नको, आमचे सर्व चांगले करा. आमच्यावर सुख समृद्धी नांदू दे. पैसा टिकू दे व यशाची प्राप्ती आम्हाला होऊ दे.

आमचे आरोग्य चांगले राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला त्या कलशासमोर करायची आहे. आणि त्यानंतर पुर्ण 30 दिवस तो कलश तुम्हाला जेथे ठेवलेला आहे तेथेच राहू द्यायचा आहे. फक्त एक दिवस त्याचे नीट पूजन करावे आणि 30 दिवसानंतर जेव्हा मार्गशीर्ष महिना संपणार तेव्हा ते नारळ आणि आपण आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. त्या कलशामध्ये टाकलेली सुपारी आणि पैसा आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवायचा आहे. आणि उरलेले तांब्यातील पाणी आपण थोडेसे घरात शिंपडावे व बाकीचे पाणी आपल्या घरातील तुळशीला टाकून द्यावे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा कलश आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *