नवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा? दिशा कोणती असावी? दिवा विजला तर काय करावे?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोकं घट-स्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात. नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही. जर का हा दिवा विझला तर हे वाईट मानले आहे आणि मित्रांनो नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायीचा साजूक तुपाने अखंड दिवा लावतात.

आणि मित्रांनो जर घरात गायीचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकता आणि नवरात्रातील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं.नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत, ज्यांना आपल्याला पाळावे. जेणे करून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात. सहसा लोकं पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात.

आणि जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता आणि मातीच्या दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापड्यानं पुसून वाळवून घ्या मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आणि अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये हा दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावं नंतर लावावं आणि दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी तांदुळ ठेवा.

आणि ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावा पासून बनवलेली असते. सव्वा हाताचा मापाचा हा रक्षा सूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात आणि हा अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता आणि अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावं पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याचा वर काचेचे झाकण ठेवावं.

आणि संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्या आणि हा दिवा ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवांचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व- दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वी कडे किंवा उत्तरेकडे असावं आणि अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात देवी देवतांना आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुख समृद्धी नामदेव आणि मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *