घटस्थापना कशी करावी? सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो यावर्षी 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रौत्सव हा अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र सुरु होतं. पुढचे नऊ दिवस हा उत्सव सुरु राहतो आणि शुक्ल पक्षातील नवमीला तो संपून दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. म्हणजेच यंदा 26 सप्टेंबरपासून 5 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव चालणार आहे. 5 ऑक्टोबर या दिवशी दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाईल. तर मित्रांनो आज आपण आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने घटस्थापनेची पूजा करायची आहे याबद्दलची सर्व विधिवत माहिती आज जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो सुरवातीला आपण घटस्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात त्यानंतर विधिवत घटस्थापना कशी करावी या बाबतची माहिती बघूयात. तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला वातीसाठी कापुस लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला देवीचे ओटीचे साहीत्य लागणार आहे. पाने, हळद, कुंकू व घटासाठी दोरा लागणार आहे. त्याच्यानंतर देवीचे सौंदर्य साहित्य देखील काढून ठेवा. पुजेसाठी फळे, घटासमोर व देवासमोर काढण्यासाठी रांगोळी पण लागेल. आणि 7 प्रकारचे धान्य लागणार आहे, त्याच्या मध्ये 7 विविध प्रकारचे आपण कोणतेही धान्य घेवु शकतो. मुग, मसूर, ज्वारी, तांदुळ, हरभरा, बाजारी, गहू असे कोणतेही धान्य घेवु शकता.

आणि मित्रांनो आता घटासाठी आपण मातीच मडकं घ्यायचे कारण ते शुभ मानले जाते. त्यानंतर देवीचा फोटो किंवा मातीची मुर्ती सुध्दा चालेल. तसेच प्रथम गणपती स्थापना करून घ्यायची आहे. आपण ही स्थापना करत असतांना पानाचा विडा घ्या म्हणजे पानावर स्थापना करायची आहे. त्यानंतर पुजन करून घ्यायचे आहे. हळद, कुंकू लवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्यासाठी आपण कलश घेतला आहे तो कलश कोठेही खाली ठेवायचा नाही तो ठेवण्यासाठी छोटे ताम्हण घेउन ताम्हणामध्ये खाली तांदुळ ठेवायचे आहेत व त्यावरती कलश ठेवायचा आहे.

आणि त्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे, व त्या कलशाच्या बाहेरील बाजूने हळदी कुकूंने स्वस्तिक काढुन त्या कलशाचे पुजन करून घ्यायचे आह आणि आता त्याच्यामध्ये पाच विडयाची पाने ठेवायची आहेत, त्यासाठी पाच पानांना हळदी कुंकू लावुन ती कलशामध्ये ठेवायची आहेत. हे सर्व झाल्यानंतर देवाच्या ठिकाणी हा कलश आपण स्थापना करायचा आहे व त्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळावर देखील आपण स्वस्तिक काढुन घ्यायचे आहे. स्वस्तिक काढल्यामुळे ते शुभ प्रतिक मानले जाते. त्यानंतर ही झाली आपली कलश स्थापना आता त्याच्यावर फुल ठेवून नमस्कार करायचा आहे.

आता आपण घटस्थापना करून घ्यायची आहे, घटस्थापनेसाठी जी आपण पाटी घेतली होती ती पाटी ठेवायची आहे. त्या पाटीमध्ये एक दोन पेर एवढा उंच मातीचा थर होईल अशी माती टाकायची आहे. वेदीका तयार करायची आहे वेदीका तयार करत असतांना ॐ वेदीकाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आता त्या पाटीमध्ये आपल्याला 7 प्रकारचे धान्य जे धान्य आपण घेतले आहे ते टाकायचे आहे. त्याच्यावर पुन्हा थोडी माती टाकायची आहे, त्यामाती मध्ये पुन्हा सगळं एकत्र करून घ्यायचे आहे त्याच्यावर घटाचं मडक ठेवायचं आहे. आणि त्या मडक्यामध्ये पाच किंवा सात पान ठेवायची आहेत.

आणि त्या मडक्याच्या बाजुला धागा बांधुन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला नऊ पानांची नऊ फुलांची माळ तयार करायची आहे. अशी ती नऊ दिवस फुलांची माळ तयार करून बांधायची आहे आणि जी माळ आपण बांधणार आहोत ती माळ आपल्याला घटांमध्ये सोडायची आहे. अशा पध्दतीने नऊ दिवस माळी तयार करायच्या आहेत व घटामध्ये सोडायच्या आहेत आणि घटामध्ये आपल्याला सुपारी व हळकुंड देखील टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर देवीचं ओटीचं साहीत्य समोर ठेवायचे आहे. देवीला सुध्दा हार तयार करून घालायचा आहे, त्यानंतर देवीला फुले, पाच प्रकारची फळे ठेवायची आहेत आणि देवीला नमस्कार करायचा आहे.

आणि त्यानंतर पानांच्या किंवा फुलांच्या माळी लावायचा आहेत अखंड नऊ दिवस आपल्याला देवीसमोर व घटासमोर दिवा हा प्रज्वलित ठेवायचा आहे. तसेच नऊ दिवस आपल्याला देवीचे नामस्मरण करायचे आहे आणि व्रत करायचे आहे. आपल्या घरावर कुटूंबावर देवीचा आर्शिवाद असावा म्हणून दैनंदिन आपण नऊ दिवस या घटाची पुजा करायची आहे. हे पुजन झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर देवीची आरती करायची आहे. धुप, अगरबत्ती लावायची आहे. आपली इच्छा देवीसमोर वक्त करायची आहे अशा पध्दतीने आपली घटस्थापना पुर्ण होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *