नवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की येत्या सोमवारपासून म्हणजेच 26 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे, आणि मित्रांनो 26 सप्टेंबर पासून सुरू झालेला हा नवरात्र उत्सव पाच ऑक्टोंबर पर्यंत असणार आहे. मित्रांनो या काळामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बरकत येण्यासाठी आपल्यातील बरेच जण या दिवसांमध्ये आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेचे पूजन करत असतात. मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये जर आपण माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची अगदी मनापासून पूजा सेवा जर केली तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये बरकत येते त्याचबरोबर सुख समृद्धी नांदते.

तर मित्रांनो अशा या नवरात्र उत्सव होण्यापूर्वी जर आपण आपले घर पवित्र करून घेतले किंवा घरामध्ये असणाऱ्या नकारात्मक गोष्टी बाहेर काढून टाकल्या तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये लगेच प्रवेश करते. तर मित्रांनो आज आपण नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण काम आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहे त्याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की ज्या घरामध्ये स्वच्छता असते पवित्र असतं माता लक्ष्मी लगेच प्रवेश करते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहते आणि तिचा आशीर्वाद सुद्धा त्या घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींवर आणि संपूर्ण घरावर राहतो यामुळे घरामध्ये कधीही कोणतीही अडचण निर्माण होत नाही त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता सुद्धा प्रवेश करत नाही.

म्हणूनच मित्रांनो यावर्षीची नवरात्र उत्सव सुरू होण्याअगोदर आपण आपले घर नक्की पवित्र आणि स्वच्छ करून घेतले पाहिजे आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला ही नवरात्र येण्याअगोदर घरामध्ये असणाऱ्या सर्व खराब झालेल्या वस्तू आणि जे काही घरांमध्ये असणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाले आहेत त्या सर्व बाहेर काढायचे आहेत त्याचबरोबर घरामध्ये साठलेले भंगार सुद्धा आपल्याला या नवरात्र उत्सवाच्या अगोदर घराच्या बाहेर काढायचे आहे आणि घरामध्ये जर खराब झालेल्या देवी देवतांच्या मुर्त्या किंवा फोटो असतील तर त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढायचे आहेत आणि अशा सर्व नकारात्मक गोष्टी आणि वस्तू आपल्या घराच्या बाहेर काढल्यानंतर आपल्याला आपले संपूर्ण घर व्यवस्थितपणे झाडून आणि धुवून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला नवरात्र येण्याअगोदर हे एक काम आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि घरामध्ये असणाऱ्या सर्व खराब वस्तू आणि नकारात्मक वस्तू आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपले घर संपूर्ण स्वच्छ झाडून पुसून घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपले घर संपूर्ण स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला एक छोटासा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने केला तरीही चालेल परंतु शक्यतो हा उपाय घरामध्ये असणाऱ्या महिलेनेच करायचा आहे तर हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे.

तर मित्रांनो संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर उपाय करायचा आहे. मित्रांनो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचा आहे, हे गोमूत्र शिंपडत असताना मित्रांनो आपल्याला सर्वात आधी आपल्याला एका वाटीमध्ये आपल्याला गोमूत्र घेऊन त्यामध्ये आपल्याला एक किंवा दोन चिमूट हळद टाकायचे आहे आणि त्यानंतर याचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे गोमूत्र संपूर्ण घरामध्ये शिंपडायचा आहे परंतु मित्रांनो हे गोमूत्र शिंपडत असताना सर्वात आधी आपल्याला आपले घर संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सर्व नकारात्मक गोष्टी भंगार घरातून बाहेर काढून आपल्याला ही अशा पद्धतीने गोमूत्र प्रत्येक खोलीमध्ये आणि कोपऱ्यामध्ये शिंपडायचा आहे मित्रांनो नवरात्र येण्याआधी हा एक छोटासा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *