अविधवा नवमी श्राद्ध का? कोणासाठी? कसे व कधी केले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मांमध्ये पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. मृत पितर म्हणजेच आपले पूर्वज यावेळी भूतलावर येऊन आशीर्वाद देतात अशी या पंधरवड्यामागची श्रद्धा आहे. यंदा 10 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात झाली असून 25 सप्टेंबर पर्यंत तिथीनुसार श्राद्ध व पिंडदान तसेच तर्पण क्रिया पार पडतील आणि त्याचबरोबर मित्रांनो पितृ पक्षात मातृ नवमीचे विशेष महत्त्व आहे.

या दिवशी ज्यांच्या मातेचे, बहीण किंवा पत्नीचे निधन झाले आहे त्यांनी श्राद्ध कार्य करायचे असते आणि त्याचबरोबर पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे किंवा महिलेचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध म्हणजे आविधवा नवमी श्राद्ध होय. म्हणजेच मित्रांनो सुवासिनी महिलेला किंवा स्त्रीचा जर मृत्यू झाला असेल तर तिच्यासाठी मुलांनी हे अविधवा नवमी श्राद्ध करायचे असते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे.

आणि मित्रांनो ही अविधवा नवमी श्राद्ध या 2022 पितृपक्षांमध्ये 19 सप्टेंबर सोमवारच्या दिवशी आलेली आहे, आणि मित्रांनो विधवा नवमी शब्द या दिवशी कोणत्याही स्त्रीचा म्हणजेच आपल्या घरामध्ये असणारी आई किंवा बहीण किंवा एखाद्या पतीची पत्नी यांचे निधन झाले असेल तर त्यांचे श्राद्ध ज्या दिवशी केले जाते त्याला अविधवा नवमी श्राद्ध असे म्हटले जाते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी मृत्यू झालेल्या घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही स्त्रीसाठी श्राद्ध करायचे असते आणि त्याचबरोबर या दिवशी नैवेद्याचा स्वयंपाक करून कोणत्याही एका स्त्रीला किंवा सुवासिनीला जेवू घातले जाते आणि त्याचबरोबर तिला अलंकार साडी इत्यादी वस्तू देऊन तिचा पाहुणचार केला जातो.

आणि मित्रांनो आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार या विधवा नवमीच्या दिवशी स्त्रीचे श्राद्ध करण्यामागे आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे ज्यावेळी एखाद्या स्त्रीचे एखाद्या व्यक्तीसोबत लग्न होते आणि तिथून पुढे त्यांचा संसार सुरू होतो आणि ज्यावेळी अचानक पणे ही स्त्री आपल्या पतीची साथ सोडून जाते.

म्हणजेच ज्यावेळी तिचा मृत्यू होतो त्यावेळी तिला तिच्या पतीची तिच्या मुलाबाळांची आणि त्याचबरोबर तिच्या घराची काळजी लागून राहते आणि म्हणूनच तिचा आत्मा शांत रहावा तिला शांती मिळावी, म्हणून तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसाराचा गाडा आम्ही सावरण्याचा प्रयत्न करू असा तिला विश्वास देऊन तिच्या आत्म्याला शांती देणारा हा विधी असतो.

आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रानुसार आणि ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार अविधवा नवमीच्या दिनी श्राद्धकार्य करणे अत्यंत पवित्र मानले जाते. घरात सुख समृद्धी येण्यासाठी हा दिवस शुभ आहे. तसेच यादिवशी घरातील सौभाग्यवती महिलांनी व्रत केल्यास त्यांना सदैव सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते आणि मित्रांनो नवमीच्या दिवशी सकाळी स्नान करून सफेद कपडे परिधान करावे.

घराच्या दक्षिणेला एका पाटावर मृत पितरांचा फोटो ठेवून त्यावर हार घालवा. यादिवशी काळ्या तिळांचा दिवा लावणे शुभ मानले जाते. यादिवशी गरुड पुराण किंवा भगवदगीता पठण करावे. पूजेनंतर वाडी ठेवून गाय, कुत्रा किंवा कावळ्याला भोजन दान करावे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *