नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की सध्या पितृ पक्ष सुरू आहे. या काळात आपण पितृ साठी श्रद्ध घालत असतो. भाद्रपद पौर्णिमा पासून ते भाद्रपद अमावस्या पर्यंत पितृ पक्ष असणार आहे. या पंधरा दिवसात शक्यतो कोणी नवीन काम किंवा कार्य कोणी करत नाही या संपूर्ण पक्षपंधरवडा हा आपल्या पूर्जनासाठी समर्पित असतो.
आपल्या पूर्जनाचा आशीर्वाद मिळावा या साठी हा काळ खुप महत्वाचा मनाला जातो आणि मित्रांनो अशी मान्यता आहे. आपले पितृ हे कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरी येतात, आणि आपला भाग ग्रहण करतात. काही पुरातन गोष्टीत नुसार देवी देवतांच्या आशीर्वाद घेण्याआधी आपल्या पितृनाचा आशीर्वाद खुप महत्वाचा असतो.
आणि मित्रांनो जर का आपले पितृ आपल्यावर नाराज असतील तर देवाचा सुद्धा आशीर्वाद लवकर प्राप्त होत नाही आणि ज्यांच्या वर पितृ नाराज असतात अशा लोकांना खुप समस्यांना सामोरे जावे लागते. सारख्या प्रमाणात अडचणी येत असतात.
कोणतेही कार्य हाती घेतले कि त्यात अडचणी सुरु होतात. आर्थिक समस्या खुप मोठ्या प्रमाणात जाणवत असतात. जर का पण पितृपक्षात चागले काम केले तर आपल्या आपले पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या काळात आपण काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्याला पितृनाचा आशीर्वाद मिळू शकता.
मित्रांनो, तुम्हाला जर असे वाटत असेल की, जीवनात कधीही पितृदोष होऊ नये. तर, पितृपक्षाचा महिन्यात त्या पंधरा दिवसात हे काम नक्की करा. त्यामुळे तुम्हाला कधीही पितृदोष होणार नाही. तुमचे पितृ तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही. त्यांच्या श्राप तुम्हाला कधीही मिळणार नाही.
त्यांचा आशीर्वादच तुम्हाला मिळेल आणि मित्रांनो, पितृपक्ष हा पंधरा दिवसाचा छोटा महिना मानला जातो. या दिवसात आपण आपल्या पित्रांना नैवेद्य देत असतो. त्यांना जेवू घालत असतो. त्यांचे तिथीनुसार श्राद्ध घालत असतो. पंधरा दिवसांमध्ये रोज किंवा तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी १ काम नक्की करा.
मित्रांनो त्यामुळे तुम्हाला तुमच्या पित्रांचा श्राप लागणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला कधीही पितृदोष होणार नाही आणि मित्रांनो यासाठी आपल्याला जी एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आपल्या सर्वांच्या घरामध्ये असणारे एक मूठ काळे तीळ. आपल्या घराच्या छतावर किंवा ज्या ठिकाणी कावळा जाऊन त्याला स्पर्श करेल असा ठिकाणी ठेवायचे आहे. काळे तीळ हे श्रद्धा मध्ये वापरले जातात. म्हणून तुम्हाला काळे तीळ ठेवायचे आहे. या काळात त्यांना फक्त आणि फक्त कावळ्याने स्पर्श केला पाहिजे. अशा ठिकाणीच तुम्हाला ठेवायला हवे. मित्रांनो हा उपाय या पंधरा दिवसात तुम्ही कधीही करू शकता.
किंवा तिथीला करू शकता किंवा रोज ही करू शकता. यामुळे तुम्हाला कधीही पितृदोष होणार नाही किंवा ज्यांना पित्र दोष आहे तो दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.