पितृपक्षात रोज घराच्या उंबरठ्यावर ‘असे’ शिंपडा पाणी : कोणतीही वाईट शक्ती, अडचण, वाईट नजर घरात येणार नाही !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो पितृपक्ष सुरू झाला आहे आणि पितृपक्षा पासून दररोजच घराच्या उंबरठ्यावर असे शिंपडा पाणी त्याने आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती अडचण वाईट नजर कोणतीही बाधा प्रवेश करणार नाही. 10 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर पासून पुढील पंधरा दिवस हा पितृपक्ष राहणार आहे. याला पितृपंधरवडा देखील म्हणतात.

पितृपक्षामध्ये आपले पूर्व जे कोणी वारलेले आहे त्यांच्या तिथीनुसार श्राद्ध घातले जाते इतरांना तर्पण केले जाते. त्यांना आठवले जाते पितृपक्षामध्ये आपलेच पूर्वज नाही. तर त्या आधीचे आपले आधीची पूर्वज असतात. जे मृत्यू झालेले असतात ते या पितृपंधरवड्यामध्ये जमिनीवर येतात. असे मानले जाते. आणि ते जमिनीवर आल्यानंतर अन्नग्रहण करतात तर्पण ग्रहण करतात.

10 सप्टेंबर पासून जो पितृपंधरा सुरू झालेला आहे. तो पंधरवडा पितरांचा पंधरवडा असतो आणि या महिन्यांमध्ये आपल्या घराचे रक्षण देखील आपल्याला केले पाहिजे. म्हणूनच यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तू पण म्हणजे आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडायचे आहे. हे पाणी शिंपडत असताना घरातील मुख्य स्त्रीने किंवा घरातील कोणत्याही इतर स्त्रीने हा उपाय केला तरी चालतो.

सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर जी व्यक्ती घराचा मुख्य दरवाजा उघडते त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे.किंवा घरातील इतर कोणत्याही सदस्याने ज्या सदस्याने सर्वात पहिला घराचा मुख्य दरवाजा उघडलेला आहे. त्या व्यक्तीने देखील हा उपाय केला तरी चालतो. ज्या व्यक्तीने सर्वात पहिला घराचा दरवाजा उघडलेला आहे. त्या व्यक्तीने एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. हे पाणी मात्र शुद्ध घ्यायचे आहे.

एक तांब्याभर पाणी घेतल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जे अगरबत्ती ची उदी असते. ती अगरबत्ती ची उदी त्यात तांब्यावर पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे. आणि ते उदी मिश्रित पाणी आपल्या घराच्या मुख्य उंबऱ्यावर पायऱ्यांवर कट्ट्यांवर शिंपडायचे आहे. हे पाणी शिंपडत असताना, आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यापासून सुरुवात करायची आहे. आणि राहिलेले पाणी घराच्या समोर शिंपडायचे आहे.

म्हणजेच काय तर तांब्यातील सर्व पाणी उंबरावर व आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शिंपडायचे आहे. अशा पद्धतीने पितृपंधरवडा सुरू झाल्यापासून घराच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडा हे आपल्याला सर्व पितृ अमावस्या पर्यंत करायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. कारण रात्रभर जी वाईट शक्ती आपल्या घराच्या बाहेर उभे असते. ती घरामध्ये येण्याची शक्यता असते.

त्यामुळे या उपायाने ती निघून जाते. कोणतीही वाईट शक्ती, नजर बाधा, आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. आपल्या घराचे व आपल्या घरातील सर्व सदस्यांचे यामुळे रक्षण होईल. त्यामुळे पितृपंधरवड्यामध्ये तुम्ही देखील घराच्या उंबरठ्यावर वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे दररोज उद्या. मिश्रित पाणी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर शिंपडा याचे चांगले लाभ आपल्याला होतील.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *