पितृपक्षात मुख्य दरवाजावर टाका ‘हि’ वस्तू : पितर प्रसन्न होतील, वर्षानुवर्षाचा आशीर्वाद लाभेल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो भाद्रपत पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीत, पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंडदान केले जाते, श्राद्ध केले जाते आणि तर्पण केले जाते जेणेकरून पित्र हे आपल्यावरती प्रसन्न होतील.

त्यामुळे पित्र आपल्याला शुभ आशीर्वाद देतील, त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख, शांती, समाधान, यश मिळते आणि ह्यामुळे व्यापार धंद्यात आपल्याला सफलता प्राप्त होते. तुमच्या कुंडलीत जर पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांची लग्न जुळण्यास जर अडचण येत असेल, किंवा अगदी कोणत्याही प्रकराची समस्या येत आहे तर तुम्ही हा एक उपाय करू शकता.

मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेकउपाय सांगितले आहेत मात्र मित्रांनो प्रेत्येकाला श्राद्ध, तर्पण, पिंडदान जमेल असे नाही. अनेकजणांना ह्यामधील काहीच माहिती नसते.काही जणांना समस्यांमुळे हे सर्व करणे शक्य नसते. तर अश्या वेळी आपण जाणून घ्या कि असा एक उपाय जो पूर्ण पितृपक्षात आपण अगदी आजपासूनच अगदी पितृपक्ष आहे तोपर्यँत हा उपाय दररोज करायचा आहे.

उपाय अगदी साधा सोपा आहे व पितरांना प्रसन्न करणारा आहे आणि मित्रांनो जर तुमहाला वाटते कि तुमच्या कुंडलीत जर पितृदोष आहे तर मित्रांनो तुम्ही एक रुपया कमवता पण तुमचे सव्वा रुपये खर्च होतात. दररोज एकामागोमाग संकटे येतच आहेत.

तर मित्रांनो अश्या वेळी आपल्याला पितृपक्षात काय करायचे आहे, तर एक कलश घेईचा आहे अगदी तांब्या असला तरी चालेल, किंवा अगदी छोटासा मातीचा मटका घेतला तरी चालेल आणि ह्यामध्ये आपण संपूर्ण पाणी भरून घ्याचे आहे. जेव्हा तुम्ही पाणी भरत आहात तेव्हा तुम्हाला अर्ध्या तांब्या पाणी घ्याचे नाही तर तुम्ही अगदी संपूर्ण भरून घ्याचा आहे. त्यानंतर आपण ह्या पाण्यामध्ये आपण 2 ते 3 थेंब गंगाजल टाकायचे आहे. आणि त्यानंतर आपण ह्यात कोणतीही 2 पांढरी फुले आपण त्यात टाकायची आहेत. त्यानंतर हा पाण्याने भरलेला कलश आहे तो आपण आपल्या घराच्या उंबऱ्यावर बाहेर कुठेही आजूबाजूला ठेवून द्याचे आहे.

आणि त्याआधी आपण ज्या ठिकाणी कलश ठेवणार आहोत त्या जागी आपण कलश ठेवायचा आहे. हा कलश घराच्या बाहेर असाच ठेवायचा आहे, दुसऱ्या दिवशी आपण हे पाणी आपल्या घरात शिंपडायचे आहे. आपल्या घरात जे मुख्य द्वार आहे. त्या घराच्या द्वारावर आजूबाजूला असे पाणी आपण शिंपडयाचे आहे. दुसऱ्या दिवशी आपण परत आपल्याला तीच कृती परत करायची आहे. हे सलग आपण अमावस्या होईपर्यँत करायचे आहे. हा उपाय करताना म्हणजेच कलश ठेवण्यापूर्वी आपण स्वस्तिक अवश्य काढायचेच आहे आणि त्यानंतर त्यावर हा कलश ठेवावा.तर अश्या पद्दतीने आपण हा उपाय केला तर आपल्या कुंडलीतील पितृदोष तसेच, तुमच्या घरावर येणाऱ्या अडीअडचणी दूर होतील.

आणि मित्रांनो श्राद्ध करणे आपल्यचाने शक्य नसेल तरी आपण हा अगदी घरगुती साधा सोपा उपाय नक्की करावा आणि मित्रांनो आपल्या घरातील जे मडके आहे किंवा हंडा ठेवत असाल तर त्या हंड्यात आपल्या पितरांचे स्थान मानले जाते आणि अनेकजण आपल्या स्ववयंपाक घरात हंडा ठेवत नाहीत प्रेत्येकाच्या घरात आजकाल फिल्टर असतात. त्यामुळे हंडा भरून ठेवला जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या किचन मध्ये असा हंडा भरून ठेवत नसाल तर कमीत कमी तुम्ही एक तांब्या भरून पाणी ठेवलेच पाहिजे म्हणजे ह्यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न राहतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *