नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो, आता पितृपक्ष सुरू झाला आहे आणि पितृपक्ष मध्ये ठरलेल्या तिथीला आपल्या घरातील जे व्यक्ती गेले आहेत म्हणजेच जे मरण पावले आहेत. त्यांच्यासाठी आपण श्राद्ध करत असतो. परंतु हे श्राद्ध करताना आपण श्रद्धेने व विश्वासाने हे करायला हवे. त्यामुळेच आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात. आणि मित्रांनो आपले पितृ हे देवा प्रमाणे असतात. त्यामुळे त्यांचे श्रद्धेने श्राद्ध करायला हवे. आजच्या या लेखामध्ये पितृपक्षात श्राद्ध करतो त्या श्रद्धातील भोजनामध्ये म्हणजेच नैवेद्या मध्ये कोणते पदार्थ आवश्यक असतात याची माहिती सांगणार आहोत.
मित्रांनो पितृपक्षात खास करून श्राद्ध करताना आपण जेवण करतो, गोड पदार्थ करतो त्या मध्ये कोणते पदार्थ अतिशय महत्वाचे असतात अन् कोणते पदार्थ दिल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आपण कोणते पदार्थ आवर्जून करायला पाहिजे या गोष्टी सुद्धा महत्वाचे आहे. ब्राह्मण पूजन, ब्राह्मण भोजन हे श्राद्धांची मुख्य कृती आहेत त्यातही ब्राह्मण भोजन व कुटुंबीय नातेवाईक यांना भजन देणे महत्त्वाचे समजले जाते श्राद्ध पक्ष यांच्या स्वयंपाकही शास्त्राने सांगितल्यानुसार असावा.
मित्रांनो, ब्राह्मण भोजन, ब्राह्मण पूजन आणि पिंड प्रधान मुख्य कृत्य आहेत. यामध्ये ब्राह्मण भोजन कुटुंब व्यक्ती यांनी भोजन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. श्राद्धाचा नेवेद्य ही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे असावा लागतो. त्यात खास करून भात ,आळु,कोशिंबीर,चटणी,पोळी, खीर, भाजी, वडे, वरण, तूप, जवस, तीळ यांचा समावेश असला पाहिजे आणि मित्रांनो काही ठिकाणी दुधात तांदूळ घालून त्याची खीर करतात. तर काही ठिकाणी गव्हाची खीर करतात. श्राद्ध पक्षाच्या दिवशी घरच्या देवाचे नैवेद्य, देवस्थानचे ब्राह्मण व पितृ स्थानचे ब्राह्मण यांना जेवायला वाढताना कडी, लिंबू व मीठ हे पदार्थ वाढत नाहीत.
मित्रांनो यामागचं कारण असे की, पित्रांना भाजलेले, तळलेले पदार्थ आवडतात म्हणून, आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांना उकडलेले, आंबट व खारट पदार्थ आवडत नाहीत त्यामुळे कडी लिंबू व मीठ हे पदार्थ वाढत नाहीत. ब्राह्मण जेवायला वाढण्याबरोबरच स्वयंपाकाच्या सुवासाने ही आपले पितृ आपल्यावर तृप्त होत असतात. पदार्थ करत असताना जो वास येतो तो त्यांना आवडत असतो. फळांमध्ये नारळ, केळी ,आंबा, द्राक्षे, बोर ,डाळिंब, खजूर हे फळ पित्रांना आवडतात. मित्रांनो काकडी, दोडके, खजूर, सूंट, आले ,लवंग, चिंच, मुळा वेलदोडे, पत्री ,हिंग, गूळ ,साखर हे पदार्थ जेवणात वापरायला पाहिजे असे हे शास्त्र काराचे मत आहे. याच बरोबर गाईचे दूध, दही, तुप तसेच म्हशीची लोणी, ताप, तूप वापरावे असे सांगितले आहे.
परंतु तुम्ही तुमच्या परीने तुमच्या पद्धतीने श्राद्ध करत असाल तर श्राद्धामध्ये दोन गोष्टींचा समावेश अति आवश्यकतेनुसार करावा पहिली गोष्ट म्हणजे पितरांचा आवडता पदार्थ म्हणजे आजी-आजोबा आई-वडील असतील त्यांना काय आवडत होते तो एक पदार्थ ठेवावा आणि दुसरा पदार्थ म्हणजे खव्याची खीर किंवा तांदूळ टाकून बनवलेली खीर आवश्यकतेप्रमाणे करावी म्हणजे दोन पदार्थ त्या जेवनामध्ये असलीच पाहीजे बाकी इतर भाजी वरण भात तुम्ही करू शकतात तर या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण साध्य करते वेळी आवश्यक जपायला हव्यात तसेच लक्षात ठेवायला हव्यात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.