13 सप्टेंबर अंगारकी संकष्टी चतुर्थी : ‘या’ 6 राशींचे भाग्य चमकणार : पुढील 11 वर्ष राजयोग

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि विशेष म्हणजे अंगारकी चतुर्थीचा अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. मंगळवारच्या दिवशी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.

प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात आणि एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येत असते ती कृष्ण पक्षात शुक्लपक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला वरध विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. यावेळी चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी येत असते त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.

आणि मित्रांनो असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य आणि संकटे येत असतील तर त्यावेळी गजाननाची उपासना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट दूर होतात. भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सोबतच सुख समृद्धीची बहार व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्तगण सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास करतात आणि चंद्रोदयानंतर भगवान श्री गणेशाची पूजा करून उपास सोडला जातो. श्री गणेशाच्या उपासनेसाठी चतुर्थीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

आणि मित्रांनो या अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी वृद्धी योग सिद्धि योग बनणार आहे. या योगाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जीवनावर दिसून येईल. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे.

आता आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येण्यासाठी वेळ लागणार नाही आणि जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणारा दुखाचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे.गजाननाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे.

चला तर मग मित्रांनो पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- मेष राशीवर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. यावेळी मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी होणार आहे. त्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. मित्रांनो आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुखाचा काळ ठरणार आहे. आता जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होईल आणि मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत. या काळामध्ये आपल्याला करिअर आणि व्यापारामध्ये भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव आणि जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनामध्ये सुखाची बाहार येणार आहे. अनेक दिवसांचा आडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अंगारिका संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ लाभकारी ठरणार आहे. शेतीमध्ये नव्या योजना आकणार आहात. आधुनिक शेती करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते आणि आधुनिक शेती केल्याने आपल्याला चांगले लाभ देखील प्राप्त होणार आहेत. मानसिक ताणतणाव दूर होईल. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. संततीकडून एखाद्यी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. गजाननच्या आशीर्वादाने जीवनात येणारे संकटे बाधा आता दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून जीवनामध्ये चालू असणारा अपयश आणि अपमान जनक काळ आता समाप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे आणि मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम फलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट पाहावयास मिळणार आहे. गजाननाची कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने नव्या योजना आखणार आहात.चांगला नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण आता दूर होईल. अध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे मनाला एक नवी प्रेरणा प्राप्त होईल. जीवन जगण्यामध्ये आनंद निर्माण होणार आहे. या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर अंगारकी संकष्टी चतुर्थीचा सखारात्मक प्रभाव दिसून येईल. चतुर्थीपासून पुढे एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे‌. गजानन बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. त्यामुळे जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होईल. जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत आणि सासरच्या मंडळीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. घर परिवारामध्ये सुखाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. घरामध्ये एखादी धार्मिक अथवा मंगल कार्य घडून येण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे. गणेशाच्या कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये सुखाच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आनंदाचे दिवस परत पुन्हा एकदा आपल्या वाट्याला येणार आहेत. मागील काळात घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा यावेळी भविष्याचा विचार करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत‌ गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

मीन राशि- मीन राशीवर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. संकष्टी चतुर्थीपासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ग्रहनक्षत्राची अनुकूलता गजाननचा आशीर्वाद आणि नशिबाची साथ मिळवून जीवनामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक आवक जरी चांगली होणार असली तरी या काळामध्ये पैशांची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *