नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो, पित्रू पक्षा मध्ये चुकूनही ही 7 कामे करू नका. नाहीतर पितृ क्रोधित होतील, नाराज होतील आणि आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आपले पितृ जर आपल्यावर क्रोधीत झाले तर, आपल्याला पितृदोष लागतो. पित्र जर नाराज झाले तर आपले कोणतेही काम होत नाही. कामात सतत बाधा येत राहते. यश मिळत नाही आणि घरात सुख-समृद्धी, शांतता, आपुलकी कायमची नाहीशी होते.
मित्रांनो, सात कामातील पहिले काम म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा पितृपक्षामध्ये अपमान करू नका. मग ती व्यक्ती छोटी असू दे किंवा आपल्याला एवढे असू दे किंवा आपल्यापेक्षा मोठे असू दे. कुठल्याच व्यक्तीला अपमानित करू नका. दुसरे काम म्हणजे गाईला व कुत्र्याला त्रास देऊ नका. कारण या महिन्यात आपले पित्र गाय व कावळ्याचा रूपातच येत असतात. त्यांना रोज खायला चपाती द्या.
तिसरे काम म्हणजे पितृपक्षाचा महिन्यात मांसाहार जेवू नका. कारण आपण या महिन्यात त्यांच्यासाठी श्राद्ध घालत असतो आणि श्राद्ध ही एक पूजा समान असते. चौथे काम म्हणजे व्यसनी माणसांनी पित्रू पक्षा मध्ये व्यसनापासून दूर रहावे. व्यसन अजिबात करू नये. पाचवी काम म्हणजे आपण जे पितृपक्षामध्ये श्राद्ध करत असतो ते श्राद्ध आपल्या घरीच करावी. दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध कधीही करू नये.
सहावे काम म्हणजे आपण श्राद्धाच्या दिवशी जो प्रसाद करतो तो प्रसाद घेतल्यानंतर दुसऱ्यांदा स्वयंपाक करू नये. म्हणजेच आपण जो श्राद्धाला प्रसाद केलेला असतो तोच संध्याकाळी खावा. दुसरे जेवण करू नये. सातवे काम म्हणजे पितृपक्षाचा महिन्यात कधीही नवीन वस्त्र खरेदी करू नये किंवा नवीन वस्त्र देखील या महिन्यात घालू नयेत. हा आपला सण नसतो तो आपल्या गेलेल्या माणसांसाठी केलेले त्यांच्या आत्मा शांतीसाठी केलेले श्राद्ध असते.
या सात कामांबरोबरच पितृपक्षाचा महिना कोणालाही वाईट बोलू नये. कोणाबरोबर ही वाईट वागू नये.यावरील गोष्टींपैकी काही गोष्टी आपल्याकडून कळत-नकळत घडत असतात. त्या घडू नयेत व आपल्यावर आपले पित्र नाराज होऊ नये. ते क्रोधीत होऊ नयेत. म्हणून या टाळाव्यात.
यामुळे तुमचे पित्र तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही.तुम्हाला पितृदोष काही लागणार नाही. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद, आपुलकी राहील. तुम्हाला तुमच्या कामांमध्ये यश येईल. तुमच्या कामाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.