नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो घरातले किचन हे समृद्धीचं प्रतीक आहे, कारण इथूनच सर्वांचे मन व आत्मा तृप्त होण्याचे कार्य चालते. वास्तुशात्राप्रमाणे किचन मधील सर्व वस्तू योग्य प्रमाणात भरलेल्या असणे खूप आवश्यक आहे. आपल्या घरात नेहमी भरभराट राहावी, घर नेहमी भरलेलं राहावे यासाठी आपल्या किचन मधील काही वस्तू कधीच संपू देऊ नयेत.
त्या थोड्याश्या शिल्लक असतानाच त्या पुन्हा भरून ठेवाव्यात. चला तर पाहुयात नेमक्या कोणत्या वस्तू आहेत ज्या कधी संपू देऊ नयेत. मित्रांनो यामधील सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ. मित्रांनो घरामध्ये मीठ कधीही संपू देऊ नये. तसेच कोणी शेजारी पाजारी मीठ मागायला आल्यासही देऊ नये.
मित्रांनो जर घरातील मीठ जर संपले तर घरावर करणी तंत्रमंत्र होऊ शकतात. आणि जर शेजारी पाजारी मीठ जर दिले तर एखादी वाईट बातमी कानावर पडू शकते. तसेच मीठ कोणाच्या तळहातावरही ठेऊ नये. घरात जर भाजीत मीठ कमी असेल आणि कोणी मीठ मागितले तर कधीही प्रत्यक्ष हातात देऊ नये.
मित्रांनो हातावर मीठ दिल्यास किंवा घेतल्यासही वाईट बातमी ऐकायला मिळू शकते. त्याशिवाय असेही म्हटले जाते कि घरातील मीठ संपले व अचानक कोणी पाहुणे आले तर वेळप्रसंगी त्यांना काय द्याल, घरात जर मीठ असेल तर आपण पटकन काहीही बनवून त्यांना देऊ शकतो असे ग्रामीण भागात सांगितले जाते.
मित्रांनो त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे हळद, घरातील कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर केला जातो. लग्नातही आधी हळद लावली जाते. देवांनाही आधी हळद मग कुंकू लावले जाते. म्हणजे हळदीचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल. किचन मध्ये जर हळद संपली तर याचा अर्थ असा होतो कि तुम्हाला आता कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळणार नाही. कारण हळद म्हणजे शुभ, जर तुम्हाला वाटत असेल कि शुभ बातमी नेहमी आपल्याला ऐकायला मिळावी तर डब्यातील हळद थोडीशी शिल्लक असेल तेव्हाच हळदीचे दुसरे पाकीट घरात आणून ठेवा.
त्यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे घरामध्ये असणारे दूध, मित्रांनो असे म्हणतात कि घरात नेहमी दूध भरलेलं असावे, दूध घरात नेहमी उतू जावे. म्हणजे घर भरल्या गोकुळासारखे असते. कितीतरी व्यक्ती घरात पाहुणे आले कि दूध घ्यायला दुकानात जातात. परंतु आपली संस्कृती आहे कि अतिथी देवो भव. अतिथींना आपण भगवंताचे रूप मानतो. म्हणून जर घरात पाहुणे आले असतील आणि त्यांना चहा कॉफीसाठी दूध नसेल तर तो भगवंताचा निरादर समजला जातो. म्हणून भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घरातील दूध कधीही संपू देऊ नये.
आणि त्याशिवाय दूध कधीही उघडे ठेऊ नये. फ्रिजमध्येही ठेवलेले दूध कधीही झाकूनच ठेवावे. नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण होतात. दूध संपण्यापूर्वीच घरात जास्त दूध आणून ठेवावे. आणि त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे घरामध्ये असणार पिठ.घरातील पीठही कधीच संपू देऊ नये, थोडेसे पीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच पिठाची सोय करावी. घरातील पीठ संपणे म्हणजे आपल्या अपमानाची सुरुवात होणे होय. यामुळे आपला मानसन्मान कमी होतो. घरात किंवा समाजात आपल्याला अपमानित व्हावे लागते. तसेच गहू संपल्यास मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागतो.
मित्रांनो यानंतरची पुढची पाचवी म्हणजे शेवटची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ, घरातील तांदूळही कधीच संपूर्ण संपू देऊ नयेत. एक वाटी तांदूळ शिल्लक असतानाच लगेचच तांदुळाची गोणी आणून ठेवावी. घरातील तांदुळ एकही दाना शिल्लक न राहणे याचा अर्थ असा होतो कि घरातील सुख संपदा निघून जाणे होय. घरात जर सुख व समाधान हवे असेल तर घरातील तांदळाचा डबा नेहमी भरलेला असावा आणि तर मित्रांनो या त्या 5 वस्तू आहेत ज्यांना आपल्या घरातून कधीच संपूर्ण संपू देऊ नका.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.