पितृपक्षात स्वामींची ‘ही’ सेवा करा, खूप लाभ मिळतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे मानले जाते की, पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृपक्षात पिंड दान आणि श्राद्ध हे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात.

हे केल्यानं पूर्वज प्रसन्न होऊन आपल्या वंशजांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात आणि पितृपक्ष पंधरवडा हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि मित्रांनो पुढे तो 15 दिवस चालतो. तर मित्रांनो या काळामध्ये जर आपण देवी देवतांचे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांची अगदी मनापासून पूजाच्या आणि सेवा केली तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतोच.

आणि त्याचबरोबर आपले शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपायही जर आपण या काळामध्ये केले त्यामुळे आपल्याला असणारा पितृदोष आपण कमी करू शकतो आणि त्याचबरोबर देवी-देवतांचा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपण प्राप्त करून घेऊ शकतो.

तर मित्रांनो आज आपण या पितृपक्षात म्हणजेच या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायची आहे आणि त्याचबरोबर ही सेवा करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायचे आहेत की ज्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरावरही स्वामींची कृपादृष्टी राहील.

तर मित्रांनो ही सेवा घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते आणि त्याचबरोबर ज्यावेळी आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळी देवपूजा झाल्यानंतर ही सेवा आपण केली तरीही चालेल तर मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते.

आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहा सप्टेंबर शनिवार या दिवसापासून आपल्याला या सेवेला प्रारंभ करायचा आहे आणि मित्रांनो तिथून पुढे 25 सप्टेंबर रविवार या दिवसापर्यंत म्हणजेच घटस्थापनेच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे मित्रांनो तुम्ही 10 सप्टेंबर पासून दररोज सकाळच्या वेळी ही सेवा करायला सुरुवात करायची आहे ती 25 सप्टेंबर पर्यंत दररोज अगदी मनापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे.

तर ही सेवा करत असताना सर्वात आधी या सेवेमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही दररोज देवपूजा करता त्या पद्धतीने देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच सर्वात आधी या सेवेमध्ये तुम्हाला कालभैरव अष्टक याचे वाचन एकदा करायचे आहे.

मित्रांनो सर्वात आधी कालभैरव अष्टक याचे वाचन करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. मित्रांनो या सेवेमध्ये फक्त तुम्हाला या तीनच गोष्टी अगदी मनापासून करायचे आहे.

तर मित्रांनो सर्वात आधी कालभैरवाष्टक याचे एक वेळेस वाचन आणि त्यानंतर एक वेळेस तारक मंत्राचा जप आणि त्याचबरोबर एक माळ म्हणजेच 108 वेळा आपल्याला स्वामी समर्थांच्या नामाचा जप या सेवेमध्ये करायचा आहे आणि त्यानंतर देवघरांमध्ये बसूनच स्वामी समर्थांना आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे.

आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील किंवा जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात यासाठी स्वामींकडे प्रार्थना करायचे आहे आणि मित्रांनो पूजेसाठी बसताना आपल्याला आपल्या उजव्या बाजूला दोन अगरबत्ती लावायचे आहेत आणि त्याचबरोबर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर ही सेवा आपल्याला पूर्ण विश्वासाने मनाने आणि श्रद्धेने करायचे आहे मित्रांनो जर तुम्ही या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये ही एक स्वामींची चमत्कारिक सेवा केली तर यामुळे तुमच्यावर असणारे पितृदोष आणि त्याचबरोबर सर्व दोष आणि घरामध्ये असणाऱ्या पीडा दोष सर्वकाही दूर होतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचाही आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.