देवी देवतांची मूर्ती फुटणे हे शुभ की अशुभ? फुटलेल्या मूर्तीचे काय करावे?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो बऱ्याचदा घरातील देवाची मूर्ती, फोटो अचानक पडून फुटतो, अचानक तडा जातो किंवा स्वछता करताना नकळत तो निसटून फुटतो तसेच घरातील देवी देवतांच्या मुर्ती ज्या काचेच्या किंवा मातीच्या असतात त्या पडतात, फुटतात. दैनंदिन जीवनात नेहमीच असा अनुभव आपल्याला येतो.

अशाप्रकारे एखाद्या देवतेची मूर्ती खंडित होण, मूर्ती फुटण हा तर अपशकुन तर नाही ना? अशाप्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात उभे राहतात. काही लोकांच्या मनात भीतीसुद्धा असते. तर कदाचित एखादी देवतेची मूर्ती फुटल्याने त्या देवतेचा कोप आपल्यावर होतो की काय? हा भ्रम आपण दूर करा. जेव्हा जेव्हा आपल्या घरातील देवघरातील देवीदेवतेची मूर्ती खंडित होईल, ती तुटेल फुटेल अशावेळी त्या मूर्तीची पूजा चुकूनही करू नका.

आणि तुमच्या मनात जी काही भीती आहे की हा अपशकुन तर नाही ना? मित्रांनो याबाबत 2 गोष्टी दिसून येतात. पहिली गोष्ट एखाद्या देवतेची मूर्ती फुटणे याचा अर्थ आपल्या कुटूंबावर आलेलं संकट या देवतेच्या मूर्तीने स्वतः वर्ती घेतलेला आहे असा याचा अर्थ होतो किंवा तुमच्या घरावर तुमच्या जीवनात एखादं खूप मोठं संकट येणार आहे यांची ही चाहूल असते. याचा हा इशारा असतो.

मित्रांनो हे 2 मत प्रवाह हिंदू धर्म शास्त्रात दिसून येतात आणि म्हणून मूर्ती फुटणे अशुभ आहे किंवा काही तरी मोठा अपशकुन घडलेला आहे अशाप्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका. तुमच्या कुटूंबावर येणाऱ्या भविष्यात, येणाऱ्या संकटाची ती चाहूल असते. ही देवता सावध करू इच्छिते.

तर मित्रांनो दुसरा प्रश्न असा आहे की या फुटलेल्या मूर्तीच नक्की करायचं तरी काय? अनेक लोक या मूर्तींना कचऱ्यामध्ये टाकून देतात किंवा रस्त्यावर चौकात टाकून देतात. अशाप्रकारे फुटलेल्या भग्न झालेल्या देवी देवतांच्या मूर्ती चुकूनही आपण कचऱ्यात टाकू नका. मित्रांनो अपल्या हिंदू धर्मशास्त्र अस मानत फुटलेल्या मूर्तींना आपण विधिवत पाण्यामध्ये विसर्जित कराव.

वाहत्या पाण्यात विसर्जित कराव. काही विशिष्ट विधीसुद्धा सांगितलेले
आहे. मात्र विधी न करतासुद्धा आपण त्याच देवतेची दुसरी मूर्ती किंवा दुसरा फोटो आपल्या घरात आणू शकता आणि तो आणल्यानंतर या भग्न झालेल्या, खंडित झालेल्या मूर्तीच किंवा फोटो विसर्जन आपण वाहत्या पाण्यात करू शकता.

आणि मित्रांनो दुसरी गोष्ट जर हा फोटो असेल तर त्याला आपण अग्नीच्या सुद्धा स्वाधीन करू शकता अगदी अग्निमध्ये स्वाहा करू शकता आणि मित्रांनो अग्निसुद्धा एक पवित्र प्रकारचं तत्व आहे. जे पंचतत्व आहेत त्यातील एक तत्व आहे आणि अग्निच्या स्वा धी न अशाप्रकारे देवीदेवतांच्या फोटोना आपल्याला करता येत आणि सोबतच आपल्या घरात जर देवी देवतांचे कॅलेंडरस असतील कॅलेंडरवर किंवा इतर ठिकाणी देवी देवतांची चित्र असतील तर त्यांनासुद्धा आपण कचऱ्यामध्ये न टाकता अशाप्रकारे अग्निच्या स्वाधीन करू शकता आणि मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट हे विसर्जन करताना पूर्ण श्रद्धने आणि आदराने करावं.

आणि त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा अनादर असता काम नये. जर तुम्हाला पाण्यामध्ये मूर्ती विसर्जित करणं शक्य नसेल तर तुम्ही जो पिपळाच वृक्ष आहे. जे पिपळाच झाड आहे त्या पिपळाच्या झाडाजवळ या मूर्तींना ठेऊन शकता. मात्र हे झाड शक्यतो रस्त्यावरती नसावं. ते निर्जन ठिकाणी असावं. त्याठिकाणी इतर लोक कोणत्याही चुकीच्या अधार्मिक गोष्टी करून या मूर्तीची विटंबना करणार नाहीत यांचीही काळजी आपण घ्यावी लागेल. मित्रांनो ज्या फोटो बद्दल मी सांगितलं की देवी देवतांच्या फोटोना अग्निमध्ये प्रज्वलीत करू शकता, जाळू शकता. अशाप्रकारे जाळून जी राख उरेल ही राखसुध्दा आपण पिपळाच्या वृक्षच्या खाली टाकावी किंवा पिपळाच्या वृक्षच्या मुळे असतात त्या मुळाजवळ टाकली तरीही चालेल.

अशाप्रकारे आपल्याला ज्या देवी देवतांनी हे सुंदर जीवन प्रधान केलेलं आहे. आपल्या घरात जी सुख संपदा आहे त्या देवी देवतांचा आदर अशाप्रकारे आपण राखू शकतो.
मित्रांनो देवी देवतांची मूर्ती खरेदी करताना त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या खरेदी न करता आपण मातीच्या खरेदी कराव्यात. आणि जी चिनी माती जी माती असते अशा मातीच्या मूर्ती जर आपण खरेदी केल्या तर त्याचं जेव्हा आपण पाण्यामध्ये विसर्जित करु तेव्हा ही माती सहज विरघळून जाते आणि या देवी देवतांचा अनादर सुद्धा होत नाही,कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात त्या सहजासहजी म्हणजे खूप वर्ष त्यांना लागत त्याच विघटन होण्यासाठी आणि अशा मूर्ती तेथे गेल्यानंतर पुढे जाऊन त्या सागर किनाऱ्यावरती येतात.

आणि मित्रांनो अजुन एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट याठिकाणी सांगावीशी वाटते की, हिंदू धर्मशास्त्रात असा एक उल्लेख आहे की, मूर्ती 2 प्रकारच्या असतात. च ल आणि अचल. अचल मूर्ती म्हणजे जी मूर्ती अगदी काही थोड्या वेळासाठी काही दिवसांसाठी स्थापित केलेले आहे आणि दुसरी जी मूर्ती ती म्हणजे अचल. म्हणजे तुम्ही जी स्थाही रुपात तुमच्या घरात कायम स्वरूपी जी मूर्ती असते त्यामध्ये आपल्या देव घरात ज्या मूर्तीची स्थापना करतो या अचल मूर्ती होय. आणि या मूर्ती आपण सहजासहजी बदलत नाही. अशी मूर्ती जर आपणहुन खाली पडली, फुटली अशावेळी आपण मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता जी मूर्ती खाली पडलेली असेल, मात्र फुटलेली नाही आहे.

अशा मूर्तीला व्यवस्थित ठेऊन तिला साफ करून, स्वच्छ करून पाण्याने किंवा तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल
तर त्याने साफ, स्वच्छ करून किंवा दुधाने तिला अभिषेक घालून पुन्हा तिची स्थापना आपल्या मंदिरात करावी आणि अशी जर मूर्ती फुटली तर मित्रांनो अशा मूर्तीला आपण वाहत्या पाण्यात विसर्जित करावं आणि तिच्या जागी नवीन मूर्ती विधिवत स्थापित करावी. चल मूर्तींपेक्षा अचल मूर्तींची जास्त काळजी, निघा आपण राखायला हवी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *