9 सप्टेंबर अनंत चतुर्थी: घरात करा ‘हा’ नैवेद्य : गणपती बाप्पा प्रसन्न होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. हिंदू श्रद्धेनुसार, विश्वाच्या निर्मितीपूर्वी भगवान विष्णूचे अनंत रूप अस्तित्वात होते आणि विष्णूने आपल्या नाभीतून उमललेल्या कमळापासून भगवान ब्रह्माची निर्मिती केली होती आणि दरवर्षी भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला हा शुभ दिवस साजरा केला जातो.

यावर्षी अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर 2022 रोजी साजरी केली जाणार आहे आणि मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अनंत चतुर्दशीला अत्यंत महत्व आहे, कारण यादिवशी भगवान गणेश अर्थात आपले सर्वांचे लाडके गणराया पृथ्वीला निरोप देतात आणि भक्तमंडळी भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाची विसर्जन पूजा करतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो मित्रांनो 9 सप्टेंबर अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन. या दिवशी घरात करा हा नैवेद्य गणपती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मित्रांनो अनंत चतुर्दशीचा दिवस हा दिवस गणपती बाप्पांच्या विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दिवस असतो आणि मित्रांनो या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होत असते म्हणून हा दिवस खूप मोठा मानला जातो.

जस आपण अनेक चतुर्थी करत असतो, साजरे करत असतो, उपवास करत असतो, त्या दिवशी नैवेद्य करत असतो. तसेच गणपती बसण्याचा दिवस आणि गणपती विसर्जनचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण मंत्र जप करावा.

या दिवशी आपण सेवा करावी आणि या दिवशी आपण गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य करावा. कारण गणपती बाप्पा त्यांच्या घरी परत जात असतात. मित्रांनो जर तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान असतील किंवा विराजमान नसतील तरी तुम्ही हा नैवेद्य करावा. कारण आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची तांब्याची, चांदीची, पितळाची छोटीशी मूर्ती असतेच.

तर त्याच गणपती बाप्पाच्या मूर्तीला हा नैवेद्य दाखवावा. आता हा नैवेद्य कोणता आहे? तर मित्रांनो हा नैवेद्य आहे मोदकांचा हो. तुम्ही कोणतीही मोदक करू शकता, पुरणाचे करू शकतात, माव्याचे करू शकतात, खोबऱ्याचे करू शकतात, उकडीचे करू शकतात, कोणतीही मोदक जे मोदक तुम्ही करत असाल तसे मोदक करा पण मोदक अवश्य करा.

आणि मित्रांनो तुम्ही दाखवलेल्या नैवेद्यांमध्ये जी मोदकांची संख्या ही 21 असायला पाहिजे याची काळजी घ्या. तुम्ही 21 पेक्षा जास्त ही करू शकता तर कमीत कमी एकवीस मोदक तुम्ही करावे. मोदकांचा नैवेद्य केल्यानंतर तो 12 वाजायच्या आतच सकाळी तुम्ही दाखवू शकता.

12 वाजायच्या आत तुम्हाला हा मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पा पुढे दाखवायचा आहे. कारण दुपारनंतर गणपती बाप्पांचे विसर्जन सुरू होत असते आणि गणपती बाप्पा तुमच्या घरात विराजमान नसतील तरी तुम्ही देवघरात मोदकांचा नैवेद्य करून ठेवा. नक्की करून ठेवा कारण अनंत चतुर्दशीचा दिवस हा खूप मोठा असतो.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *