नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण व्रत मानले जाते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात. मित्रांनो आता सुरू असणाऱ्या भाद्रपद महिन्यामध्ये सहा सप्टेंबर रोजी परिवर्तनीय एकादशी आली होती आणि सात सप्टेंबर बुधवार या दिवशी भागवत एकादशी आलेली आहे आणि मित्रांनो या एकादशीला आपल्या शास्त्रानुसार खूप महत्त्व दिलेला आहे.
कारण मित्रांनो या एकादशीच्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंचे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचे नामस्मरण पूजा अर्चा केली तर यामुळे यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि यांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक समस्या दूर होण्यास सुरुवात होते त्याचबरोबर पैशासंबंधी अडचणी दूर होऊ लागतात.
आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांच्या जीवनात पैसा, धन नाही आहे त्या लोकांनी धनप्राप्तीसाठी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील ह्या दिवशी आपण पूजा करायची आहे. घरातील दरिद्री नष्ट होते तसेच घरात सुख शांती नांदते. मित्रांनो आपण ह्या दिवशी पूजा करताना त्यांना तुळशीची माळा नक्की अर्पण करा.
त्यांना नैवैद्य म्हणून खिरीचा प्रसाद बनवा आणि हि बनवताना एक ते दोन केसराच्या काड्या टाकायला विसरू नका कारण पिवळा रंग भगवान श्री हरी विष्णूंचा रंग आहे. आणि म्हणून त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फळे आपण अर्पण करावीत.
शास्त्रात एकादशीच्या दिवशी करण्याचा एक अचूक उपाय सांगितला जातो. हा उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होतो. हा उपाय आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी म्हणजेच सात सप्टेंबर या दिवशी संध्याकाळच्या वेळी करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी स्वच्छ स्नान करून घ्यावे व लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करावीत. आपलीकडे लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे नसतील तर काळ्या रंगाची सोडून बाकी कोणत्याही रंगाची वस्त्रे आपण परिधान करू शकतात. त्यानंतर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा आपण तुळशीजवळ जाऊन प्रज्वलित करावा.
आणि त्याचबरोबर मित्रांनो देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव ह्यांना नमस्कार करावा तसेच तुळस मातेला देखील वंदन करावे. त्यानंतर श्री हरी विष्णूंचा मंत्र म्हणता म्हणता. तुळशीमातेला 11 प्रदक्षणा घालाव्यात. मंत्र आहे, ओम नमो भगवते वायुदेवाय नमः प्रदिक्षणा आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे करायच्या आहेत आणि प्रदिक्षणा झाल्यानंतर आपण ओम नमो भगवते वायुदेवाय नमः । ह्याच मंत्राचा 21 वेळा पुन्हा जप करायचा आहे. त्यानंतर आपण तुळस मातेला नमस्कार करावा. व श्री हरी विष्णू व देवी लक्ष्मीला वंदन करावे. हा उपाय करताना काही गोष्टींचे भान ठेवावे.
जसे कि तुळशीला स्पर्श होणार नाही कारण संध्यकाळ झाल्यानंतर तुळशीला स्पर्श करणे वर्ज मानले जाते. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत आणि जर तुमचे व्रत नसेल तरी ह्यादिवशी तांदूळ लसूण कांदे ह्या गोष्टी खाऊ नयेत. तसेच तामसिक पदार्थ, धूम्रपान, मद्यपान देखील करू नये. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यास आपल्यावरती विष्णूदेवांची व लक्ष्मी मातेची कृपा होते. घरातील गरिबीचा नाश होतो. घरात सुख समृद्धी येते. घरात धनधान्याची कमतरता राहत नाही.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.