ज्या घरात असतात ‘या’ तीन वस्तू, ते घर माता लक्ष्मी कधी सोडत नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारे पैशासंबंधी सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्यातील बरेच जण रोज माता लक्ष्मीची अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा व्रत उपवास करत असतात आणि त्याचबरोबर आपले वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या काही प्रभावी मंत्रांचा आणि उपायांची मदत घेऊन ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात कारण मित्रांनो जर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न झाली आणि तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येतेच आणि त्याचबरोबर पैशांसंबंधीत सर्व अडचणी ही लवकरात लवकर दूर होतात.

तर मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत या माहितीमध्ये आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत ज्या वस्तू आपण जर आपल्या घरामध्ये किंवा देवघरांमध्ये ठेवल्या तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहील. मित्रांनो ज्या घरात असतात या 3 वस्तू ते घर माता लक्ष्मी कधीच सोडत नाही. माता लक्ष्मी आपल्यावर सतत प्रसन्न राहते व आपल्या घरामध्ये कधीही गरिबी येऊ देत नाही. माता लक्ष्मीच्या आश्या 3 आवडत्या वस्तू आहेत जे घरात असतील तर ते घर माता लक्ष्मी सोडून जात नाही आणि या वस्तू मुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते.

माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या घरावर होत असते अशी कृपा जर आपल्यावर झाली तर घरात कोणत्याही गोष्टींची कमी राहात नाही मग ते धन असुद्या किंवा धान्य असुद्या सुख असुद्या किंवा समृद्धी असुद्या सर्व काही माता लक्ष्मीच्या कृपेने मिळून यश आपल्या पदरी पडत असत म्हणून या 3 वस्तू घरात आवश्य ठेवाव्यात आणि या वस्तूनी आपल्या घरात सकारात्मकता येते आणि नकारात्मकता घरातून जाऊन घरात सुख, शांती नांदते तर जाणून घेऊया या कोणत्या 3 वस्तू आहेत. पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो तुम्ही बऱ्याच जणांच्या घरी मुख्य दरवाज्यावर पहिल्या असतील आणि हे कशासाठी लावतात कारण पंचमुखी हनुमान जर तुम्ही घरच्या मुख्य दरवाज्यावर लावलात तर आपल्या घराचे संरक्षण होते.

मित्रांनो पंचमुखी हनुमान यासाठीच लावतात जेणे करून आपल्या घरा दाराचे रक्षण व्हावे. शंख माता लक्ष्मी आणि विष्णु भगवान यांची आवडती वस्तू म्हणजे शंख, शंख आपण आपल्या देवघरात ठेवावा जर समजा शंख तुमच्या घरात नसेल तर तुम्ही स्वामी केंद्रातून सुद्धा अनु शकतात किंवा पूजा सामग्रीच्या दुकानातून घेऊ शकता.तर शंखाचा दुधाने अभिषेक करायचा आहे नंतर त्याला पाण्याने अभिषेक करायचा नंतर हळदी, कुंकू, अक्षदा टाकून पूजा करावी आणि त्या शंखाला आपल्या देवघरात स्थापन करावे आणि रोज सकाळी संध्याकाळ शंखाची पूजा करावी असे केल्याने घरात सकारात्मकता आणि शांती नांदते कारण शंख हा शांतीचा प्रतीक आहे.

आणि जर तुम्हाला शंख वाजवता येत असेल तर रोज देवपूजा करताना शंख आपल्या घरात नक्की वाजवावा. पाण्याने भरलेला माठ जुन्याकाळी सर्वांच्या घरी माठ असायचे पण सध्या फ्रिज असल्याने काही लोकांच्या घरी माठ नसतात. प्रत्येकाच्या घरात एक छोटा का होईना माठ असायला हवा मातीचा माठ आपण आपल्या घरात ठेवायला पाहिजे आणि खास करून तो माठ स्वयंपाक घरात ठेवावा कारण माठ माता लक्ष्मीचे आवडते प्रतीक म्हणून सुद्धा मानले जाते. तर तुम्ही सुद्धा पंचमुखी हनुमान, शंख आणि माठ तुमच्या घरी नक्की ठेवा याचे काही नुकसान नसून लाभाचे प्रतीक आहे आणि यापासून तुम्हाला नक्कीच लाभ होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.