वारंवार तोंड येणे यावर करा ‘हा’ घरगुती उपाय : आयुष्यात परत कधीच तोंड येणार नाही, असा जबरदस्त घरगुती उपाय!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. खूप छोटे छोटे आजार देखील आपल्याला त्रासदायक ठरत असतात. मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपणाला तोंड येण्याचा त्रास सहन करावा लागतो. त्या वेळेस आपल्या तोंडाला काहीही जेवण खाल्ले तर ते खूपच त्रासदायक ठरत असते.

आपल्या पैकी जवळपास प्रत्येकालाच तोंड येणे या प्रकारचा अनुभव आलेला असतो. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काही खाताना जिभेची आग होणे, तिखट, आंबट, खारट तोंडात सहन होत नाही. तोंड येण ही फार मोठी गोष्ट नाही. परंतु त्याचा त्रास खूप होतो.

वारंवार तोंड येण्याचा त्रास होतो हा प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचा इशारा असू शकतो. त्यामुळे वेळेवर योग्य ते उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या आजाराचे मूळ कशात आहे आणि त्यावर उपाय कोणते आहे? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.तोंड येणे या विकाराला माऊथ अल्सर म्हटले जाते.

हा आजार म्हणजे तोंडाच्या आतल्या भागाला सूज येते. त्यामुळे आपल्याला काही खाता पिता येत नाही. तोंडाला आतून फोड येतात. तोंडाच्या आतील बाजूस लाल होते आणि तोंडातून घशापर्यंत लाल होते. वारंवार तोंड येण्याच्या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी तीन प्रकारचे उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो, आपल्यालाच जाईचा पाला सगळीकडे आढळून येतो. आपल्या घराच्या आसपासही दिसतो. हा जाईचा पाला तोंडात घेऊन चांगला चावून-चावून खायचा आहे. यामुळे तोंडात याची लाळ तयार होईल ती पूर्ण लाळ आपल्या तोंडामध्ये साठवा आणि थोड्या वेळात ती लाळ थुंकून टाकायची किंवा त्याचा रस गिळला तरी काही अपाय होत नाही. हा उपाय दिवसातून सकाळ-दुपार-संध्याकाळ असा तीन वेळेस करावा. यामुळे तुमची तोंड येण्याची समस्या 100% बरी होईल. जाईचा पाला सगळं नंतर पहिल्याच दिवशी तुम्हाला परत दिसून येईल असे सलग दोन-तीन दिवस करा. यामुळे तुमचे तोंड आलेले पूर्ण बरे होईल.

मित्रांनो, आपण तोंड आल्यानंतर ते बरे होण्याचा उपाय पहिला. परंतु आता आपण कधीच तोंड येऊ नये याच्यासाठी उपाय पाहणार आहोत. यासाठी आपल्याला फक्त रोज एक पिकलेले टोमॅटो खायचा आहे. टोमॅटो गावठी असेल तर फारच चांगले. परंतु उपलब्ध झाला नाही तरी आपल्याला बाजारात जो मिळेल तो टोमॅटो खायला काहीच हरकत नाही. परंतु एक टोमॅटो रोज खाल्ला तर आपल्याला तोंड येण्याची समस्या कधीच सतावणार नाही आणि मित्रांनो आपल्याला कधीच तोंड येऊ नये असं वाटत असेल तर एक साधा उपाय करा तो म्हणजे पाणी भरपूर प्या.

परंतु मित्रांनो पाणी पिताना उभारून कधीही पिऊ नका. पाणी नेहमीच बसून प्यावे आणि एकदम न पिता घोट-घोट करून प्या. त्यामुळे आयुष्यात तुम्हाला कधीही तोंड येणार नाही. मित्रांनो, अजून काही पथ्य पाळावे लागतील ते म्हणजे झोप पुरेशी घ्या. रात्री जागरण करू नका. अति मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाऊ नका पुरेशा प्रमाणात पाणी आणि पुरेशा प्रमाणात झोप आणि व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. ही काही पथ्य पाळावे तर तुम्हाला कधीही तोंड येण्याची समस्या आयुष्यात सतावणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.