नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आज आपण गौरी घरात कशी आणावी ह्यासंबंधी आपण शास्त्रशुद्ध माहिती घेणार आहोत. जरवर्षी आपण भाद्रपत महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीस गौरी घरात आणल्या जातात. सप्तमी तिथीस गौरींचे पूजन केले जाते महानैवेद्य दाखवला जातो आणि मग अष्टमी तिथीस त्यांचे विसर्जन केले जाते.
आजच्या लेखात आपण गौरींचे आगमन कश्या पद्दतीने करावे ह्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि आपापल्या परंपरेने घराच्या उंबऱ्यातून गौरीला आत आणताना. जिच्या हातात गौरी असतील तिचे पाय दुधाने व पाण्याने धुतात नंतर त्यावर हळदी कुंकू वाहून कुंकवाने स्वस्तिक काढतात.
आणि घराच्या दरवाज्यापासून ते लक्ष्मी बसवायच्या जागेपर्यंत गौरीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे आणतात. ताट चमच्याने किंवा घंटीने आवाज केला जातो. त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी घरात, त्यांना दूधदुप्ट्याची जागा, स्वयंपाकघर इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे.
तिथे त्यांचे आशीर्वाद मिळून तिथे ऐशवर्य लाभू दे अशी प्रार्थना करतात. आणि काही लोक तेरड्यांची रोपे बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात त्या मूर्तीला साडी नेसवून, त्या मूर्तीला दागदागिन्यांनी सजवतात.
मित्रांनो पहिल्या दिवशी गौरीला भाजीभाकरीचा नैवद्य दाखवतात हि प्रथा पश्चिम महाराष्ट्रात दिसून येते. ह्यालाच गौरी आवाहन करणे असे म्हणतात. आणि प्रेत्येक ठिकाणी थोडी काही ना काही वेगळी पद्दत असते. काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही ठिकाणी पाणवठ्यावर जाऊन पाच किंवासात खडे आणून त्यांची पूजा करतात.
काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचा मुखवटा लावून त्याला साडी नेसवतात व त्यांची पूजा करतात. काही घरात गहू, ज्वारी, तांदूळ अश्या धान्यच्या राशी करून त्यावर मुखवटा ठेवतात.
तुम्ही जर बाजरात गेला तर तुम्हाला पत्र्याच्या किंवा लोखंडी सळ्यांच्या कोथळे मिळतात त्यांना सजवून साडी घालवून त्यांची पूजा केली जाते. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर देखील मुखवटा ठेवण्याची पद्दत आहे. तेरड्यांची सुद्धा गौर असते. ह्यांची रोपे अगदी मुळासकट आणतात त्यांची मूळ हि जणू गौरीची पाऊले आहेत असे समजले जाते.
आधुनिक काळात गौरीच्या मांडणीत, रूपात देखील आधुनिकता दिसून येते. आणि आगमनाच्या दिवशी मुखवट्यांची तसेच त्यांच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. त्या सखी पार्वतीसह त्यांची मुले सुद्धा मांडतात.
आणि त्याचबरोबर मित्रांनो गौरीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, जेष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते. पूजा आरती झाल्यानंतर जे काही फराळ केला आहे त्यांचा नैवद्य दाखवला जातो. नंतर संध्यकाळी आरती करतात. आणि पुरणपोळी, अंबाडीची भाजी, ज्वारीच्या पिठाची आंबील, सोळा भाज्यांची एकत्र भाजी इत्यादी पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. ह्याच सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. दर्शनाला आलेल्या महिलांचे आदरपूर्वक स्वागत केले जाते.
आणि त्यानंतर मित्रांनो शेवटचा दिवस म्हणजेच तिसरा दिवस हा विसर्जनाचा आणि ह्या दिवशी पोवत्याच्या, सुताच्या गाठी पाडतात. त्या सुताच्या गाठी, ह्या फुले सुका मेवा, रेशमी धागा, कशी फळाचे फुल इत्यादी जिन्नस घालून गाठी बांधल्या जातात. ह्या नंतर पूजा केली जाते त्यानंतर गोड शेवाळ्यांची खीर, उडीद डाळीचा भाजेलेला पापड हा नैवद्य दाखवला जातो. तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारे नैराश्य दिसून येते, गौरींची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. मात्र जर धातूच्या मूर्ती किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन केले जात नाही.
एक दोरकाची प्रथा देखील आपल्याकडे आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागात तिसऱ्या दिवशी गौरींच्या पूजेबरोबर सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याची देखील पूजा केली जाते. त्यानंतर तो गुंडा हळदीने रंगवून सुवासिनी आपल्या गळ्यात धारण करतात व नवीन पीक येईपर्यंत आपल्या गळ्यात ठेवतात. अश्विन अष्टमीला हा दोरा गळ्यातून काढला जातो त्याची पूजा केली जाते ह्या दोऱ्यालाच महालक्ष्मी असे म्हण्टले जाते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.