गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी गणपती बाप्पा घरी आल्यानंतर ‘ही’ 7 कामे चुकूनही करू नका, घर बरबाद होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो गणेश चतुर्थीपासून ते अंनत चतुर्थी पर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात येतात. आपल्या घरी मुक्काम करतात ह्या 10 दिवसाच्या कालावधीत प्रेत्येक जण बाप्पांची आराधना करतो पूजा करतो. गणपती बाप्पांची कृपा दृष्टी आपल्यावरती व्हावी घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रेत्येकाचि इच्छा असते. जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत त्या कालावधीत आपण काही नियमांचे पालन अगदी काळजीपूर्वक करायलाच हवे जेणेकरून ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांचा क्रोध उत्पन्न होणार नाही.

तर मित्रांनो ह्यातील पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्थपन करताना आपण ती अश्या प्रकारे स्थापन करावी कि बाप्पाची पाठ आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला दिसू नये कारण गणपतीच्या पाठीत दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी देवीचा वास आहे. जर चुकून आपण ह्या गणपतीच्या पाठीचे दर्शन घेतले किंवा आपली वारंवार त्याकडे दृष्टी जात असेल तर त्यामुळे घरात दरिद्रता निर्माण होऊ शकते.

मित्रांनो दुसरी गोष्ट या दहा दिवसांच्या कालावधीत आपण गणपती बाप्पांची पूजा करताना किंवा आरती ओवाळताना काळ्या अगर निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करू नका. गणपती बाप्पांना लाल आणि पिवळा हे दोन रंग अतिशय प्रिय आहेत. या रंगांचे कपडे आपण परिधान करू शकता. मित्रांनो अनेकजण अनुदानाने अगदी नकळत तुळशीची पानं म्हणजे तुलसी पत्र गणपती बाप्पांना अर्पण करतात आणि अशी चूक आपण करू नका. हिंदू धर्मशास्त्र अस मानत पौराणिक कथा अशी आहे की तुळशीने भगवान श्री गणेशांसोबत विवाह करण्यास नकार दिला तेव्हा गणपती बाप्पांनी नाराज होऊन त्यांना शाप दिला होता.

तर मित्रांनो श्री गणेश आणि नसल्याने तुळशीची पान आपण चुकूनही गणपती बाप्पांना अर्पण करू नका आणि मित्रांनो गणपती बाप्पांना मंदार म्हणजेच रुईची पान अतिशय प्रिय आहेत. सोबतच त्यांना शमीची पानं सुद्धा अतिशय आवडतात ही पाने आपण त्यांना अर्पण करू शकता. मित्रांनो एकदा आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजेच कवाडे बंद करून आपण बाहेर जाऊ नका म्हणजेच घराला लॉक करून कुलूप लावून बाहेर जाण्यास धर्मशास्त्र मनाई करत. आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत कमीत कमी एका व्यक्तीने तरी घरात सदैव या दहा दिवसांच्या कालावधीत उपस्थित राहायला हव.

मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचा दर्शन घेणं हे निसिद्ध मानलेलं आहे. जी व्यक्ती या दिवशी चंद्र दर्शन करते चंद्राकडे पाहते त्या व्यक्तीवर कोणता ना कोणता खोटा नाटा आळ हा नक्की येतोजो गुन्हा त्या व्यक्तीने केलेला नाही अशा गुन्ह्यांमध्ये ती व्यक्ती अडकते. आणि म्हणून चंद्र दर्शन या दिवशी कलंक आपल्या माती लावू शकत. म्हणून ते निश्चित आहे. मित्रांनो आपण गणपती बाप्पांची पूजा या दहा दिवसात करत आहोत. तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे मांसाहाराचा सेवन केलं जाणार नाही मांसाहार शिजवला जाणार नाही याची ही आपण काळजी घ्या.

आणि मित्रांनो आपल जे जेवण असेल आपला जो आहार असेल तो सातवीक हवा. सोबतच आपण कोणत्याही प्रकारची व्यसन मग दारू असेल सिगारेट असेल तंबाखू असेल या व्यसनांपासून सुद्धा या १० दिवसांच्या कालावधीत दूर राहायला हव. मित्रांनो खोटे बोलणे चोरी करणे किंवा वादविवाद करणे घरात एकमेकांशी मोठमोठ्याने भांडणे या गोष्टी गणपती बाप्पांना क्रोधित करतात आणि म्हणून या गोष्टींपासून सुद्धा आपण शक्यतोवर लांब राहाव. अनेक जण तर लसूण आणि कांदा सुद्धा या 10 दिवसात खात नाहीत. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही याही नियमाचे पालन करू शकता.

आणि मित्रांनो अनेक जण आपल्या घरात जे काही शिजवलं जातं जे काही अन्न तयार होतं तर त्याचा पहिला भोग नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवतात आणि मगच ते पदार्थ ते स्वतः सेवन करतात. मित्रांनो आपण सुद्धा या नियमाचे पालन करू शकता. मित्रांनो या दहा दिवसांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारे जुगार खेळणं सट्टा खेळणं या गोष्टी सुद्धा आपण करू नयेत. अन्यथा माता लक्ष्मी रुष्ट होते आणि अशा व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो आणि मित्रांनो या दहा दिवसांच्या कालावधीत आपण सातत्याने सकारात्मक विचार करावा.

आणि त्याचबरोबर या काळामध्ये आपण पॉझिटिव्ह राहाव कोणत्याही प्रकारे वाईट भाषेचा वापर किंवा शिव्या शाप देण या गोष्टींपासून आपण दूर राहा मनशांत ठेवा आणि गणपती बाप्पांचं आपण ध्यान करू शकता गणपती बाप्पांच्या मंत्रांचा जप करू शकता तर मित्रांनो या काही नियमांचे पालन गणपती आपल्या घरात आल्यानंतर आपण नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *