नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षामध्ये येणारी चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी च्या दिवशी आपण आपल्या घरात बाप्पांची स्थापना करतो. आज आम्ही आपल्याला एक विधी सांगणार आहोत, जर आपण ही विधी केली तर आपल्या घरात आनंद-सुख-समृद्धी नांदेल.सोबतच जर आपल्याकडे आलेला पैसा टिकट नसेल किंवा काही कारणाने निष्फळ खर्च होत असेल तर आपण हा उपाय नक्कीच करा ,यामुळे आपले निष्फळ खर्च तर थांबेलच सोबत धनसंपत्ती ही वाढेल आणि तसे तर आपण बप्पांना पूजेमध्ये अनेक वस्तु अर्पण करतो.
आणि त्याचबरोबर मित्रांनो या सोबत आपण जर श्री गणेश चतुर्थीला काही उपाय केले तर याचा नक्की आपल्याला लाभ मळतील. असे कोणते उपाय आहे जे पण केल्यावर आपला वर्ष भर त्याचा लाभ मिळणार आहे. आणि आपली आर्थिक स्थिती सुद्धा बद्लार आहे हे जाणून घेऊ. आपण गणपती ची मूर्ती घरी बसवत असाल किंवा बसवत नसाल तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात. मित्रांनो हा जो उपाय आपण पहाणार आहोत तो येणाऱ्या दहा दिवसात कधी हि केला तरी चालेल. पण शक्यतो गणपती स्थपनेच्या वेळी हा उपाय नक्की करा.
मित्रांनो कापुर, श्रीफळ, फूल, दूर्वा, धूप, दिप, पानाचा विडा, वस्त्र ,मोदक किंवा अन्य प्रसाद, हळद, कुंकू, शेंदुर आणि जानवे यांसारख्या अनेक गोष्टींचा वापर करून भक्त बाप्पांना खुश करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.पण जर आपल्याला धनप्राप्ती हवी असेल आणि धनहानि टाळायची असेल तर आपण गणपती बाप्पांच्या चरणी एक वस्तू ठेवायची आहे. मित्रांनो तस तर हा उपाय सोप्पा आहे, चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो तुम्ही हा उपाय आनंद चतुर्थीच्या आधी कधीही आणि कोणत्याही दिवशी करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते, मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या समोर ही एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू आहे सुपारी मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये असणारी कोणतीही पोझिशन सुपारी या उपायासाठी वापरू शकता परंतु मित्रांनो ही सुपारी आधी कोणत्याही पूजेला वापरलेली नसावी म्हणजेच नवी कोरी सुपारी तुम्हाला या उपायासाठी वापरायचे आहे.
आणि मित्रांनो उपाय करतात त्यांना सर्वात आधी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या समोर एक रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो ही सुपारी तुम्हाला त्या एक रुपयाच्या शिक्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांबरोबरच त्या सुपारीची ही पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच हळद-कुंकू सुपारीला वाहून अक्षदा वाहून अगरबत्ती धूप तिच्यासमोर लावायचा आहे अशा पद्धतीने त्या सुपारीचे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्या सुपारीचे पूजन केल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना आणि त्याचबरोबर त्या सुपारीला घरामध्ये सुख-समृद्धी यावी काहीही कमी पडू नये यासाठी प्रार्थना करायची आहे.
आणि मित्रांनो अशा पद्धतीने त्या सुपारीची स्थापना गणपती बाप्पांच्या समोर गेल्यानंतर तुम्हाला ती सुपारी आनंद चतुर्थीच्या दिवसापर्यंत किंवा तुम्ही ज्यावेळी गणपतीचे विसर्जन करणार आहात त्या दिवसापर्यंत ती तशीच तिथे ठेवून द्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आनंद चतुर्थीच्या दिवशी बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर किंवा ज्यावेळी तुम्ही घरामध्ये असणाऱ्या बाप्पांचे विसर्जन आहात त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी मित्रांनो तुम्हाला ती सुपारी आणि एक रुपयाचा शिक्का एका पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये गुंडाळायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि मित्रांनो जर तुमचा व्यवसाय असेल तर अशावेळी तुम्ही ते तुमच्या ऑफिसच्या गल्ल्यांमध्ये ठेवू शकता.
तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर तुम्ही आपल्या घरामध्ये केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये असणारे पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली असेल तर हा एक सोपा उपाय नक्की करून पहा यामुळे गणपती तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारे पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.