गणपतीवर लावलेली दुर्वा घरात ‘इथे’ ठेवा : घरात बरकत येईल, श्रीमंती येईल !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो गणपतीवर लावलेली दुर्वा घरात ‘इथे’ ठेवा , यामुळे घरात बरकत येईल, श्रीमंती येईल. हो मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये गणपतीच्या दुर्वा बद्दल विशेष माहिती आपण आज येथे जाणून घेणार आहोत.

आता प्रत्येकाच्या घरात गणपती बसलेले आहेत. काही मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण सुरू आहे. गणपतीचे आगमन झाल्यापासून आपण गणपतीला रोज दुर्वा वाहतो. त्याच्यासोबत आघाडा वाहतो. गणपती जवळ फळे ठेवतो. अक्षद कुंकू वाहतो आणि दररोज सकाळ संध्याकाळी आरती करतो. बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवतो.

पण मित्रांनो आपण गणपतीला जी रोज दुर्वा वाहतो ती आपण पाण्यामध्ये प्रवाहित करून सोडतो किंवा इतर कुठेही टाकतो. मित्रांनो गणपतीच्या अंगावर वाहिलेली दुर्वा तिला विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. आणि त्यामध्ये विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते. त्यामुळे गणपतीवर वाहिलेली दुर्वा कुठेही टाकू नका. आणि आम्ही या लेखांमध्ये जी विशेष माहिती सांगत आहोत त्याप्रमाणे ती ठेवल्यास आपल्या घरामध्ये खूप बरकत येईल, श्रीमंती येईल, आणि सुख शांती समाधान लाभेल.

तर मित्रांनो गणपतीवर वाहिलेली दुर्वा आपल्या घरातील तिजोरीमध्ये किंवा आपल्या घरातील किमती वस्तू पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवावी. जर ऑफिसमध्ये असेल किंवा दुकानांमध्ये असेल तर ज्या ठिकाणी ऑफिस किंवा दुकानांमध्ये आपण पैसे ठेवतो महत्त्वाची कागदपत्रे ठेवतो त्या ठिकाणी ही दुर्वा ठेवावी. यामुळे व्यवसायात देखील प्रचंड वाढ होते. आणि आपला कमाईचा आलेख वाढता राहतो.

मित्रांनो आपण गणपती कितीही दिवस बसवा उदाहरणार्थ पाच दिवस सात दिवस नऊ दिवस किंवा अकरा दिवस. कोणत्याही एका दिवशीची दुर्वा आपणाला आपल्या घरात कायमस्वरूपी ठेवायची आहे. बाकीच्या दिवसांची दुर्वा ही आपण जेव्हा गणपती विसर्जन करतो त्यावेळी कुठेही प्रवाहित केली तरी चालेल.

मात्र गणपतीच्या अंगावर वाहिलेली दुर्वा पैकी कोणत्याही एका दिवसाची दुर्वा नक्की आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवली पाहिजे त्यामध्ये विशेष शक्ती व विशेष सकारात्मक ऊर्जा जी निर्माण झालेली असते त्यामुळे आपल्या घरात बरकत तर येथेच त्याशिवाय प्रचंड श्रीमंती येते आणि घरात सुख समाधानाचे वातावरण निर्माण होते.

मित्रांनो हा उपाय अनेक जणांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चित अशी यश प्राप्त झाले आहे. आपण देखील हा उपाय करून लाभ घेऊ शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *