गणेश चतुर्थी पासून रोज संध्याकाळी घराबाहेर ‘असा’ लावा एक दिवा: सर्व विघ्ने नष्ट होतील, प्रगतीचे योग जुळतील !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. आता काळ बदललेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला बदलायला हरकत नाही. आता या बदललेल्या जगात सगळ्या जुन्या चालीरीती पाळणे शक्य होत नाही. देवाच्या पूजेत शेवटी भक्तिभाव महत्वाचा असतो आणि आपल्या घरामध्ये काही लोक अशीच कायमस्वरूपी मूर्ती ठेवतात. श्रीगणेश चतुर्थीला तिची प्रतिष्ठापना करतात आणि ज्यांचा गणपती फक्त दीड दिवसाचा असतो, ते लोक दुसऱ्या दिवशी गणपतीचे घरातच विसर्जन करून परत सुरक्षित जागी ठेवतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरांत आणि चौकाचौकांत गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. भक्त गणेशाला आपापल्या आवडीच्या रूपात घडवून घेतात. याविषयी शास्त्रात पूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये या संपूर्ण माहिती बरोबरच काही उपाय देखील सांगितलेले आहेत हे उपाय जर आपण या दिवशी केले तर यामुळे आपल्याला खूप लाभ होऊ शकतो तर मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक उपाय पाहणार आहोत हा उपाय जर आपण गणपती बाप्पांच्या आगमन झाल्यानंतर करायला सुरुवात केली तर यामुळे बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि त्याचबरोबर त्यांची कृपादृष्टीही तुमच्यावर राहील.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना 31 ऑगस्ट 2022 बुधवार या दिवशी गणेश चतुर्थी आली आहे आणि या गणेश चतुर्थीपासून रोज संध्याकाळी घराबाहेर असा लावा एक दिवा साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल. तुम्हाला माहीत असेल की, कोणताही सण असो किंवा कोणताही खास विशेष दिवस असो आपण दिवे लावतो. देवांची पूजा करतो. खास करून दिवाळीमध्ये, नवरात्रीमध्ये आपण घराबाहेर दिवे लावतो जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरात येऊ शकेल. मित्रांनो दिवाळीच्या दिवशी सुद्धा आपण दिवे लावतो आणि लक्ष्मीपूजनामध्ये गणपती आणि लक्ष्मीची पूजन करतो. मित्रानो यासाठीच हे गणपतीचे खास दिवस आहेत जसे गणपती चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत.

हे 11 दिवस खास असतात. तुम्ही गणपती बसवला असेल किंवा नाही बसवला असेल किंवा 1 दिवसाचा असेल 5 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल, 11 दिवसाचा असेल तर काही फरक पडत नाही. तुम्ही 11 दिवस गणपती बसल्यापासून पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत रोज तुमच्या घराबाहेर संध्याकाळी असा एक दिवस नक्की लावा आणि मित्रांनो हा दिवा तेलाचा, तुपाचा असू शकतो.

कोणतेही तेल घेऊ शकता, तुम्ही कोणताही तूप घेऊ शकता. तुम्ही कोणताही दिवा घ्या मातीचा, स्टीलचा, पितळेचा तांब्याचा कोणता हि दिवा घ्या. कापसाची वात घ्या, धागेदोऱ्याची वात घ्या, कोणतीही वात घ्या छोटासा दिवा लावा आणि घराबाहेर ठेवा.

घराबाहेर कुठे ठेवाल तर आपण जेव्हा घरातून दिवा घेऊन बाहेर जाल तेव्हा तुमची जी उजवी बाजू असेल, जो उजवा हात असेल तिथे तुम्हाला दिवा ठेवून द्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण घराच्या आतून बाहेर बघतो तेव्हा जी उजवी बाजू असेल तिथे तुम्हाला हा दिवस ठेवायचे आहे आणि नियमितपणे आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दहा अकरा दिवसांचा वेळ असतो. तरी संपूर्ण दिवस तुम्हाला रोज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे. त्याने माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल सुख-समृद्धी घरात नांदेल, बरकत घरात राहील, पैसा कधीच कमी पडणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *