गणेश चतुर्थी दरम्यान करा ‘हा’ उपाय : गणपती बाप्पांच्या समोर ठेवा ‘ही’ 1 वस्तू: सुख समृद्धी नांदेल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षामध्ये येणारी चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि मित्रांनो गणेश चतुर्थी च्या दिवशी आपण आपल्या घरात बाप्पांची स्थापना करतो. आज आम्ही आपल्याला एक विधी सांगणार आहोत, जर आपण ही विधी केली तर आपल्या घरात आनंद सुख समृद्धी नांदेल.सोबतच जर आपल्याकडे आलेला पैसा टिकट नसेल किंवा काही कारणाने निष्फळ खर्च होत असेल तर आपण हा उपाय नक्कीच करा ,यामुळे आपले निष्फळ खर्च तर थांबेलच सोबत धनसंपत्ती ही वाढेल. चला तर मग मित्रांनो पाहूयात कोणता एक प्रभावी उपाय आपल्याला या गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या धनसंपत्तीत वाढ होईल.

तसे तर मित्रांनो आपण बप्पांना पूजेमध्ये अनेक वस्तु अर्पण करतो. ज्यात कापुर, श्रीफळ, फूल, दूर्वा, धूप, दिप, पानाचा विडा, वस्त्र ,मोदक किंवा अन्य प्रसाद, हळद, कुंकू, शेंदुर आणि जानवे यांसारख्या अनेक गोष्टींचा वापर करून भक्त बाप्पांना खुश करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.पण जर आपल्याला धनप्राप्ती हवी असेल आणि धनहानि टाळायची असेल तर आपण गणपती बाप्पांच्या चरणी ११ रुपये ठेवावे. दिसायला तर हा उपाय सोप्पा आहे,पण आम्ही या सोबत काही नियम सांगणार आहोत, त्या नियमांचा अवश्य पालन करा.

मित्रांनो सगळ्यात आधी बाप्पांच्या चरणी ११ रुपये ठेवा. जर आपल्याला शक्य असेल तर आपण २१,५१,१०१ रुपये ही ठेवू शकता. हे पैसे आपल्याला अनंत चतुर्दर्शी पर्यंत ठेवायचे आहे. यादरम्यान आपल्याला रोज गणपतीची विधीवत पूजा करायची आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी गणपति स्तोत्राचे पठन ही करावे.जर आपण स्तोत्रांचा पठन केला तर आपल्याला लवकर लाभ मिळतो.

मित्रांनो जेव्हा आपण गणपती विसर्जन करतो तेव्हा ते चरणी ठेवलेले पैसे आपण तिथुन उचलून घ्यावे आणि आपल्या घरात किंवा दुकानात धन ठेवायची जी जागा असेल त्या जागी ते पैसे ठेवावे.यानंतर आपण बाप्पांकडे पूर्ण शुद्ध मनाने प्रार्थना करावी की आपल्याकडे धनामध्ये वाढ होत रहावी आणि अनावश्यक खर्च थांबावे. पुढे वर्षभर आपल्याला हे पैसे कधीही वापरायचे नाही आहे. तसेच कधीही हे पैसे अस्वच्छ ठिकाणी ठेवल्या जाणार नाही, याची काळजी घ्यावी.दर महिन्याला २ चतुर्थी येतात. या दोन्ही चतुर्थीला आपण हे पैसे बाप्पांच्या चरणी ठेवावे आणि बाप्पांची विधीवत पूजा करावी. यानंतर पुढच्या दिवशी ते पैसे पुन्हा त्याच्या जागेवर ठेवून द्यावी.

हा प्रयोग आपल्याला वर्षभर प्रत्येक चतुर्थीला करायच आहे.यामुळे आपल्या जीवनात धनप्राप्ती वाढेल आणि हा खुप काळ टिकून राहील आणि अनावश्यक खर्च ही थांबेल. पूजेसोबतच आपण जर गणेश स्तोत्रांचा पठन केल्यास लवकर फायदे मिळतील.जर आपल्याला स्तोत्र येत नसेल तर आपण मोबाईल वर ही हे लावू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये गणपती बाप्पांचे आगमन करायचे आहे आणि त्यांची विविध पणे स्थापना करायचे आहे आणि मित्रांनो त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू जास्वंदाचे फुल आणि नैवेद्यामध्ये मोदक या गोष्टी अर्पण करायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा आणि सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद नक्की तुम्हाला प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *