31 ऑगस्ट गणेश चतुर्थी : गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय : हवे ते सर्व मिळेल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे आणि मित्रांनो हिंदू शास्त्रात गणपची बाप्पाला बुद्धिची देवता मानले जाते. तसेच कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी बाप्पाची आराधना केली जाते.

आणि ज्योतिष शास्त्रानुसार, बुद्धिची देवता असणाऱ्या बाप्पाचा गणेश चतुर्थीच्या काळात हा राशींवर कृपा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचे स्वामी गणपती बाप्पा आहेत. त्यामुळे ज्या राशीचे स्वामी बुध ग्रह आहेत. त्यांच्यावर नेहमीच बाप्पाचा आर्शिवाद असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने केली जाते मित्रांनो या वेळी गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे या दिवशी गणेश भक्त त्यांची उपासना करतात तसेच गणेशाचे व्रत देखील करतात भगवान गणेश हे सिद्धी सिद्धी देणारे आणि शुभ लाभ प्रदान करणारे देवता आहे.

आणि मित्रांनो ह्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना काही विशिष्ट वस्तू अर्पण करू शकता कि ज्यामुळे श्री गणेश प्रसन्न होतात , हे सर्व केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील . चला तर जाणून घेऊयात हे छोटे छोटे उपाय कोणते आहेत ते ज्या लोकांना विवाहसंबधी बाधा आहेत म्हणजे योग्य असे स्थळ मिळत नसेल किंवा जुळून येत नसेल तर अशा लोकांनी या दिवशी गणपती बाप्पाची पूजा झाल्यांनतर ॐ वक्रतुंडाय हुं ह्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा.जर तुमच्या घरात पोवळ्याची माळा असेल तर या माळेवर मंत्राचा जाप करा आणि मित्रांनो विवाह कार्यातील बाधा लवकरच दूर होतात.

आणि मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारे गरिबी दूर करण्यासाठी ह्या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या अर्क काष्ट प्रतिमेचे पूजन करा. अर्क काष्ट म्हणजे रुई च्या झाडापासून बनवलेली मूर्ती जी बाजारामध्ये सहज मिळते. तिचे पूजन केल्यास ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि ज्यांच्या जीवनामध्ये शत्रू आहेत, लोक विनाकारण त्रास देत असतील , त्यांनी शत्रूला शांत करण्यासाठी ह्या दिवशी कडुलिंबाच्या लाकडापासून बनलेल्या गणपती बाप्पाचे पूजन करावे आणि शत्रू मुक्तीची प्रार्थना करावी आणि हस्ति पिशाचि लिखे स्वाहा ह्या मंत्राचा जप करा , तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा किंवा कोणी काही केलेले असेल तर ती निघून जाईल.

आणि मित्रांनो हे सर्व उपाय करत असतानाच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना बाप्पाला लाल चंदनाचा टीका लावा आणि त्याचबरोबर लाल रंगाचे फुल अवश्य वहा आणि २१ दुर्वा नक्की अर्पण करा. जास्वदीं चे फुल नक्की अर्पण करा ते नसेल तर झेंडू चे फुल सुद्धा चालेल. पूजा झाल्यानंतर गूळ किंवा मोदकाचा नैवेद्य नक्की दाखवा. मित्रांनो अशा पद्धतीने हे काही छोटेसे उपाय जर तुम्ही या 31 ऑगस्ट 2022 या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी केले तर यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख अडचणी समस्या दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.