उद्या 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला करू नका ‘या’ चुका : मोठे नुकसान होईल !

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो यंदा बुधवारी 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थी च्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये प्रत्येक जण करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करण्याची मनातील इच्छा पूर्ण होतात. अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे गणेश चतुर्थी हा दिवस आपल्यातील प्रत्येकासाठी खूप आनंदाचा असतो कारण या दिवशी आपल्या घरामध्ये आणि त्याचबरोबर घराशेजारी गणपती बाप्पा ची स्थापना होत असते आणि त्याचबरोबर तिथून पुढे पाच, सात आणि अकरा दिवसांपर्यंत ते आपल्या सोबत राहतात आणि या दिवसांमध्ये सगळीकडेच प्रसन्न वातावरण ही तयार झालेले असते.

तर मित्रांनो आज आपण या दिवशी कोणकोणत्या गोष्टी कराव्या आणि त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टी करणे आपल्याला या दिवशी टाळायचा आहे याचीच सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो सर्वात आधी गणेश चतुर्थीच्या दिवशी मनोभावे गणेशाचे पूजन करावे त्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते.

जीवनातील अडचणी दूर होतात गणेश चतुर्थी निमित्त गरिबांना धान्य कपडे पैसे अशा स्वरूपात दान करावे गरिबांना जेवण सुद्धा तुम्ही देऊ शकता विनायक चतुर्थीला लवकर उठून स्नान करून लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालावे या दिवशी पुजा स्थळ स्वच्छ करून गंगाजल शीपडा आणि त्यानंतरच तिथे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे.

आणि मित्रांनो आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणीही तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करणार आहात ती जागा स्वच्छ करून मगच तिथे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो स्थापना केल्यानंतर त्याच्यासमोर दिवा प्रज्वलित करा त्यानंतर गणपतीला कुंकू अक्षता फुलं इत्यादी अर्पण करा.

गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवा त्यानंतर गणेश स्तोत्रांचे पठण करा आणि आरती करा. आणि मित्रांनो भगवान गणेशाला शक्ती सामर्थ्य बुद्धी आणि भरभराटीची देवता म्हणून ओळखलं जातं विधिवत गणरायाची पूजा करेल तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

आणि मित्रांनो असे म्हटले जाते की तुम्हालाही गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो श्रीगणेशाची उपासना केल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. गणपतीला आद्य देवता म्हणूनही ओळखले जाते. म्हणून कोणत्याही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी लोक त्यांचे आशीर्वाद घेतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो गणपती बाप्पांचे आपल्या घरामध्ये आगमन झाल्यानंतर आपल्याला त्यांची दररोज अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने पूजा आणि आरती करायचे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी गणपती बाप्पांचे आपल्या घरामध्ये आगमन होईल त्यावेळी पासून आपण आपल्या घरामध्ये आनंदी आणि प्रसन्नच वातावरण ठेवायचा आहे बाप्पांची स्थापना झाल्यानंतर घरामध्ये वाद-विवाद होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो पप्पांचे स्थापना झाल्यानंतर दररोज बाप्पांना वेगवेगळे पदार्थांचा नैवेद्य नक्की दाखवावा मित्रांनो बाप्पांना गोड पदार्थ खूप आवडतात त्यामध्ये गूळ खोबरे आणि मोदक हा त्यांचा प्रिय नैवेद्य आहे म्हणूनच या पदार्थांचा त्यांचे नैवेद्यामध्ये नक्की समावेश करावा. तर मित्रांनो 31 ऑगस्ट 2022 च्या दिवशी ज्या वेळी बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये किंवा मांडवामध्ये होईल त्यावेळी आपल्याला वर सांगितलेल्या गोष्टी आवश्यक पाडल्या पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही बाप्पांची घरी स्थापना झाल्यानंतर वरील गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवल्या आणि बाप्पांची अगदी मनापासून पूजा, अर्चा, आरती केली तरी यामुळे बाप्पा तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद ही तुम्हाला प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.