31 ऑगस्ट बुधवार गणेश चतुर्थी, बाप्पांचे मुख ह्या दिशेला चुकूनही करून मूर्ती ठेवू नका घरात गरिबी येईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो गणपती बाप्पांचे आगमन हे ३१ ऑगस्ट ह्या दिवशी होणार आहे. गणपती बाप्पा अनंत चतुर्थी दिवशीपर्यंत वास्तव्य करतात. काही जण एक दिवसाचा, दीड दिवसाचा, पाच आणि दहा दिवसांचे गणपती बसवतात. अनेकांनी एक प्रश्न विचारला होता कि गणपतीच्या मूर्तीची स्थापना आपण नेमकी कोणत्या दिशेला करावी. गणपती बाप्पांचे मुख म्हणजेच तोंड हे कोणत्या दिशेला असावे. आणि पूजा करताना पूजा करणाऱ्याचे मुख हे कोणत्या बाजूला असावे असे सर्व शास्त्रशुद्ध माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रानुसार आणि विशेषकरून गणपती पुराणानुसार, आपल्या घरात गणपतीची स्थपणा करण्यासाठी सर्वोत्तम दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा ईशान्य दिशा म्हणजे कोणती तर उत्तर आणि पूर्व ह्यांच्या मधील दिशा होय. मित्रांनो हि देवांची दिशा मानली जाते आणि ह्या दिशेला स्थापन केलेली गणेशांची मूर्ती घरात लक्ष्मीचा स्थिर वास करते. म्हणेजच अश्या घरात पैसा येतो आणि आलेला पैसा टिकून देखील राहतो सोबतच प्रेत्येक कार्यात यश आणि सफलता देखील मिळते आणि तुमचे प्रेत्येक कामात तुम्हाला यश मिळू लागते.

मित्रांनो दुसरी जी दिशा आहे ती आहे उत्तर दिशा, आपल्या घरातील उत्तरेकडील जी भिंत आहे त्याच्या मधोमध आपण जर श्री गणेशांची मूर्ती जर स्थापन केली तर त्यामुळे घराची आर्थिक प्रगती वाढते. घरात पैसा येऊ लागतो आपले निर्णय योग्य ठरतात निर्णय क्षमता त्या घरातील लोकांची वाढते. सर्व लोकांना त्या घरात सुरक्षा कवच प्राप्त होते आणि जर घरातील कोणतिही कामे अडलेली आहेत. तर ती कामे पुन्हा एकदा सुरु होऊन त्यात तुम्हाला यश मिळते हे सर्व होते जर आपण उत्तर दिशेला मूर्ती स्थापन केली तर. आपण पश्चिम दिशेला भगवान श्री गणेशांची मूर्ती स्थापन करू शकता, ह्या दिशेला लागून स्थापित केलेली गणेशांची मूर्ती ह्यामुळे घरातील वास्तू संकटे टळतात.

आणि वास्तूतील बाधा दूर होतात आणि, भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या मनातिल इच्छा आहेत त्या इच्छा देखील पूर्ण नक्की होतात. आणि मित्रांनो आपल्यातील अनेक लोक असणावरती झोपलेले किंवा असणावरती बसलेले गणेश घरात आणतात. मित्रांनो अशी मूर्ती अत्यंत शुभ असते आणि त्यामुळे घरातील अनेक लोकांना सुख आनंद प्राप्ती होते. जे लोक कलाकार आहेत किंवा जे विद्यार्थी दशेत आहेत त्या लोकांनी नृत्य करणारी गणेशांची मूर्ती आणून पूजा करावी. मित्रांनो त्यामुळे घरात आनंदी, उत्साह, प्रगतीचे वातावरण निर्माण होते. अनेक जण घराच्या मध्यस्थानी गणेशांची मूर्ती स्थापित करण्याचा सल्ला देतात.

आणि मित्रांनो त्यामुळे गणेशांची पाठ आपल्याला सारखी दिसू शकते आणि ह्यापूर्वी आपण सांगितले आहे कि गणपती बाप्पांच्या पाठीत दरिद्रता वास करते आणि जी व्यक्ती गणपतीचा पाठीचे दर्शन घेते, त्या व्यक्तीच्या जीवनात कंगाली येते. आणि म्हणूनच श्री गणेशांची मूर्ती आपण भिंतीला चिटकवून ठेवायची आहे. जर आपल्या घराच्या चौकटीवर जर आपण गणेशांची मूर्ती ठेवली असेल तर अगदी लक्ष पूर्वक आपण ह्याच्या पाठीमागे गणेशांची मूर्तीचे आपण नक्की बसवा अन्यथा घरात गरीबीसारख्या समस्या घरात उद्भवू शकतात, घरात पैसा राहत नाही.

मित्रांनो दोन दिशा अशुभ आहेत गणपती बाप्पांची मूर्ती बसवण्यासाठी पहिली म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण दिशेच्या भिंतीला लागून चुकणंही गणेशांची मूर्ती स्थापित करू नका, आणि नैऋत्य दिशा म्हणजे पश्चिम आहे दक्षिण मधील दिशा. ह्या दिशेला आपण अवजड वस्तू घरातील ठेवाव्यात. ह्या दिशेला आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना आपण चुकणंही करू नका.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *