हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिलांनी 21 वेळा बोला ‘हा’ एक मंत्र : सर्व दुःख अडचणी दूर होतील!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरितालिका व्रत पाळले जाते. यावर्षी हरतालिका 30 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात. याशिवाय विवाह इच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठीसुद्धा हे व्रत ठेवतात. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विवाहित महिलांसाठी विशेष महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते.

आणि मित्रांनो हरतालिका व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही ठेऊ शकतात. वट सावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. हरतालिका व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशीही मान्यता आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी जर आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय घरामध्ये केले तरी यामुळे याचा चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो मित्रांनो रात्री १२ वाजता बेलाचे पान चाटून बऱ्याच जण रुईच्या पानावर मध लावून तो चाटून तर काही केळी किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत संपन्न करतात.

आणि ह्या व्रताच्या वेळी एका स्वच्छ जागी एक चौरंग ठेऊन त्या ठिकाणी पूजा केली जाते जागरण सुद्धा केले जाते. खरतर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपट तृतीयेला हि हरतालिका प्रेत्येक हिंदू स्त्री साजरी करते आणि ह्या दिवशी पार्वती मातेची विशेष पूजा केली जाते. हरतालिका ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे हरित म्हणजे हरण करणे आणि अलीका म्हणजे मैत्रणीच्या मदतीने. जसे पार्वतीने मैत्रणीच्या मदतीने केलेले शंकरांचे हरण असे ह्या शब्दांचा अर्थ होतो. हिंदू कुमारिका मुली आपल्या हवा असलेला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया आपले सौभाग्य दीर्घायुष्य टिकून राहावे म्हणून हरतालिकेचे व्रत करताना दिसून येतात.

मित्रांनो आणखीन एक उपाय या दिवशी घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक महिलेने करायचा आहे तो म्हणजे ज्याही वेळी तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये देवपूजा करणार आहात त्यावेळी या हरतालिकेच्या दिवशी आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळा करायचा आहे आणि जर 21 वेळा करणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही तीन वेळा ही या मंत्राचा जप करू शकता तर तो प्रभावी मंत्र पुढील प्रमाणे आहे,
देहि सौभाग्यं आरोग्यं देहि मे परमं सुखम्।
पुत्र-पौत्रादि समृद्धि देहि में परमेश्वरी।

तर मित्रांनो अशा पद्धतीने हा खूप प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा जप घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक महिलेने जर हरतालिकेच्या दिवशी केला तर यामुळे तिच्यावर आणि त्याचबरोबर तिच्या घरावर कोणतेही संकट येणार नाही आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे माता लक्ष्मी या प्रभावी मंत्रामुळे प्रसन्न होईल तर या हरतालिकेच्या दिवशी घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक महिलेने या प्रभावी मंत्राचा जप केलाच पाहिजे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *