पतीच्या प्रगतीसाठी हरतालिकेच्या दिवशी महिलांनी देवघरात ठेवावी एक वस्तू, पतीवर संकट येणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे व्रत साजरे केले जाते. हरतालिकेच्या दिवशी कठीण उपवास केला जातो. या वर्षी हरतालिकेचे व्रत मंगळवारी म्हणजेच 30 ऑगस्ट 2022ला केले जाणार आहे. या दिवशी महिला उपवास करतात.

तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पुजा करतात आणि मित्रांनो हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरे होणारे हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात.हरतालिका व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी. मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते. आणि मित्रांनो हरतालिका व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी व्रताची कथा ऐकली पाहिजे असेही आपले शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.

तर या सर्व उपायांबरोबरच या दिवशी घरातील महिलांनी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आणि त्याचबरोबर पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक महत्त्वाचे काम करायचे आहे जर घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक विवाहित स्त्रीने जर आपल्या पतीसाठी हा एक छोटासा उपाय केला तर तिच्या पतीवर कोणतेही संकट येणार नाही आणि त्याचबरोबर तिच्या पतीची प्रगती होईल.

तर कोणता आहे हा उपाय जो हरतालिकेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसाठी करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय करत असताना घरातील महिलांनी त्यांच्या देवघरांमध्ये एक प्रभावी आणि चमत्कारिक वस्तू ठेवायची आहे मित्रांनो या दिवशी सर्वात आधी देवघरांमध्ये जाऊन आपली दररोजची देवपूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे.

तर कोणत्याही ती वस्तू मित्रांनो ती वस्तू आहे, एक सुपारी आणि अकरा रुपये मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक सुपारी लागणार आहे ही सुपारी आपल्याला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल आणि जर मित्रांनो तुमच्याकडे घरांमध्येच एक सुपारी असेल तर तीही तुम्ही या उपायासाठी वापरू शकता परंतु हीच सुपारी न पुजलेलीच असावी.

मित्रांनो अशा पद्धतीने सर्वात आधी एक न पुजलेली सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुमचे देवघरांमध्ये देवी देवतांच्या समोर कुठेही तुम्हाला सर्वात आधी ते अकरा रुपये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर ही एक सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या सुपारीची हळदीकुंकू लावून पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि अक्षता व्हायचे आहेत.

आणि त्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी करिअरसाठी तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये बसूनच प्रार्थना करायचे आहे घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर पतीची व्यवसाय मध्ये नोकरीमध्ये बढती व्हावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो हरतालिकेच्या शुभमुहूर्तावर अशा पद्धतीने हा एक छोटा उपाय केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी गणपती बाप्पा यांचे घरामध्ये आगमन होणार आहे त्या दिवशी सकाळी ज्यावेळी घरामध्ये असणाऱ्या स्त्रिया हरतालिकेचा उपवास सोडतात त्यावेळी सर्व पूजा विधी आवरल्यानंतर आपल्याला ते अकरा रुपये आपल्या घराजवळ असणाऱ्या मंदिरामध्ये दानपेटी मध्ये टाकून द्यायचे आहेत.

आणि ती सुपारी आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे मित्रांनो जर तुम्हाला ती सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही ती सुपारी तुमच्या तुळशीमध्येही ठेवू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हा जर उपाय तुम्ही हरतालिकेच्या दिवशी केला तर यामुळे तुमच्या घरावर आणि पतीवर कधीही कोणते संकट येणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *