स्वामींना गुरु केले, गुरुपद घेतले तर कोणते नियम पाळावे व कोणती कामे अजिबातच करू नये ?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो स्वामींना गुरु केलेले असेल किंवा स्वामींचे गुरु पद घेतलेले असेल तर कोण कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे. आणि आपल्याला कोणती कामे करायची नाही. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. गुरुपौर्णिमा होऊन गेलेली आहे. आणि बऱ्याच सेवेकर्‍यांनी स्वामी समर्थ महाराजांना गुरु करून घेतले आहे किंवा त्यांचे ग्रुपच घेतलेले आहे.

बऱ्याच जणांनी स्वामींना गुरु करून घेतले असेल किंवा अन्य कोणत्याही देवी देवतांना अन्य गुरूंना गुरू करून घेतले असेल तर ज्यांनी ज्यांनी गुरु करून घेतलेला आहे. त्या सर्वांनी या नियमांचे पालन करायचे आहे. आणि ठराविक गोष्टी देखील तुम्ही अजिबात करायचा नाहीत ज्यावेळी आपण गुरु करतो. त्यावेळी आपण गुरुच्या सानिध्यात जातो.आणि काही नियम आपल्याला लागू होतात.

आणि त्या नियमांचे पालन आपल्याला करावे लागते. आपण जर नियमांचे पालन केले तरच आपल्याला याचा लाभ होतो.
जर आपल्याकडून कोणत्याही नियमांचे पालन होत नसेल तर त्यांनी गुरु करायचा नाही. नियमांचे पालन करणे ज्यांना जमते. त्यांनीच गुरु करून घ्यावा आणि अशी काही कामे आहेत. ती कामे आपल्याला गुरु केल्यानंतर अजिबात करायची नाहीत.

सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही गुरू करून घेतलेला आहात तर मांसाहार अजिबात करायचा नाही.मावसा हार खाने सोडून देऊन दररोज शाकाहारी जेवण जेवले पाहिजे. ज्या ज्या व्यक्तींना व्यसन आहे. त्या सर्व व्यक्तींनी व्यसन सोडले पाहिजे ज्यांनी गुरु करून घेतलेला आहे. त्यांनी घरामध्ये होणारे वाद विवाद कटकटी भांडणे बंद करावेत. आणि घरामध्ये वाद विवाद होणार नाहीत, याची काळजी देखील घ्यावी.

ज्यावेळी आपण गुरु करतो त्यावेळी आपले गुरु आपल्या सोबत आपल्या घरामध्ये येतात. आणि गुरूसमोर कधीही भांडण तंटे व्हायला नाही पाहिजेत. जर तुम्ही गुरु केलेला आहात. तर तुमच्या मनामध्ये इतर कोणाबद्दलही वाईट भाव वाईट विचार अजिबात यायला नाही पाहिजेत. आणि तुमच्याकडून तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा अपमान झाला नाही पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांचा अपमान अजिबात करू नका.

वरील लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे कोणतेही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून होणार नाहीत. याची काळजी तुम्हाला घेतली पाहिजे आणि चांगले नियम देखील लावून घेतले पाहिजेत. फक्त गुरु केलेल्यांनीच या नियमांचे पालन करायला पाहिजे. असे काही नाही. सर्वांनीच या नियमांचे पालन करायला पाहिजे सर्वांना मानसन्मान दिला पाहिजे. आपल्याकडून कोणतीही व्यक्ती नाराज होणार नाही. याची काळजी देखील घेतली.

गुरु करून घेतलेल्यांनी किंवा गुरुपद घेतलेल्यांनी कोणती कामे करायची आहेत तर दररोज गुरुची पूजा त्यांची सेवा केली पाहिजे त्यांचे दर्शन घ्यावे गुरूंच्या मठामध्ये केंद्रामध्ये जावे दिवसभर सतत गुरूंचे नाव आपल्या मुखामध्ये असायला पाहिजे आपले वाडवडील आपल्याला सांगतात की मुखामध्ये नाव आणि हातामध्ये काम असायला पाहिजे त्या पद्धतीने सतत गुरुंचे नामस्मरण करायला पाहिजे

आपण कोणतीही कामे करत असाल तर त्या कामासोबतच तुम्हाला तुमच्या गुरूंचे नामस्मरण करायचे आहे. त्यांना आठवायचे आहे. सर्व नियमांचे पालन करा म्हणजे गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. अन तुम्ही जर गुरु केलेला नसेल तरी देखील या नियमांचे पालन करावे. आयुष्यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळेल. वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन केले तर त्याचे लाभ आपल्याला मिळेल. गुरूंचा आशीर्वाद आपल्यावर राहील.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *