केस गळती, केसातील कोंडा रात्रीत गायब : घरगुती रामबाण उपाय !

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, केसांमधील कोंडा ही समस्या बहुतेक जणांना असते. कारण आपले केस म्हणजे आपला एक सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येकालाच वाटत असते की आपले केस मुलायम आणि निरोगी असावेत आणि परंतु केसामध्ये देखील बरेच प्रकारच्या समस्या उद्भवतात. जसे की केस गळणे ही एक समस्या आहेच.

परंतु केसांमध्ये कोंडा होणे ही समस्या फारच जास्त प्रमाणात आढळते. यामागे तशी कारणे देखील बरीच असतात. जसे की धूळ, हवेचे प्रदूषण तसेच तीव्र तापमान यासारख्या घटकांमुळे देखील ही समस्या निर्माण होऊ शकते. या लेखामध्ये आपण केसातील कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊया.

मित्रांनो आत्ताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे त्याचबरोबर चुकीच्या आहारामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना केसांच्या स म स्या आजकाल सर्वांनाच झाली आहे, केस गळती, केस पांढरे होणे, केस खराब होणे, केसात कोंडा होणे अश्या बऱ्याच समस्या केसांच्या होत आहेत. याची कारणे वेगवेगळी असू शकतात जसे की प्रदूषित हवेत केस मोकळे सोडणे, अस्वच्छ पाण्याने केस धुणे, केसांची निगा न राखणे व काही वेळेस चुकीचा शॅम्पू वापरणे व तसेच केस सतत मोकळे सोडणे अथवा खूपच टाइट बांधणे त्यामुळेही जेस खराब होतात.

आणि मित्रांनो उपाय घरीच घरातील साहित्य वापरून स्वतः करू शकता. आपल्या सर्वांच्याच घरातील, जेवणातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे दही जे प्रत्येकाला सहज उपलब्ध होते. या दह्यात ऍसिटीक गुणधर्म असतात जे कोंडा घालवण्यासाठी मदत करतात आणि
तर आपण ताजे दही न घेता ते दोन दिवस आंबट होण्यासाठी ठेवा कारण जितका आंबटपणा वाढेल तितके चांगले असते, दोन दिवसांनी संपूर्ण केसांच्या मुळावर हे दही नीट लावा. एक तासानंतर ते मा ई ल्ड शॅ म्पू ने धुवून टाका. लिंबू हा दुसरा एक अतिशय महत्वाचा व अत्यावश्यक घटक आहे. किचन मधील लिंबूचे महत्व कायम आहे.

मित्रांनो लिंबू हा कोणत्याही ऋतूत उपलब्ध असणारे फळ आहे त्याचे आयुर्वेदिक असे भरपूर उपाय आहेत त्यापैकीच एक म्हणजे केसांसाठी सुद्धा हा लिंबू गुणकारी आहे. लिंबाचा रस पाण्यात टाकून सलग दोनच दिवस केस धुतल्याने तुमच्या केसातील कोंडा निघून जाईल. तसेच तुम्ही हे कोंडा निघून जाईतोवर वरचेवर करत रहा कारण कोंड्याचे प्रमाण जास्त असल्यास तो कमी व्हायला थोडा वेळ घेतो आणि तुळस ही सुद्धा गुणकारी आहे. तिचा उपयोग विविध आ जारांवर केला जातो. त्याचपद्धतीने याचा उपयोग केसांसाठीही केला जातो.

आणि मित्रांनो आवळा व त्याचे गुणधर्मातुन केसांना हवी असणारी पोषक घटक मिळतात. तुळस आणि आवळ्याची पावडर एकत्र करून त्याची पेस्ट करून हा लेप केसांना, मुळांना लावा आणि एक तास तसेच केस ठेवा व नंतर एक तासाने केस धुवुन टाका मित्रांनो हा अतिशय परिणाम कारक व लवकर परिणाम दाखवणारा उपाय आहे. केसातील कोंड्यामुळे इन्फेक्शन होते , जखम होते त्यासाठी कडुनिंबाची पाने गुणकारी ठरतात. त्यामुळे कडुनिंबाचा पाला पाण्यात उकळून त्याने केस धुवावेत त्यामुळे केस मुलायम बनतील, तसेच केसातील फंगल जातील कारण कडुनिंब अँटी फंगल आहे.

कोरफडीचा गर म्हणजेच त्याचा आतला भाग, गाभा हा चेहऱ्यासाठी गुणकारी आहे तसेच तो आपल्या केसांसाठी देखील आहे. कोरफडीचा गर काढून तो केसांच्या मुळांना लावल्यास तेथील फंगल मारतात, कोंडा नाहीसा होतो आणि त्यामुळे कोरफडीचा गर हा केसांच्या मुळांना लावून एक दीड तासाने केस सॉफ्ट शॅम्पू ने धुवा, असे सलग तीन चार दिवस करा. कोंडा नक्की जाईल. हे उपाय करत असताना कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. कारण हे सारे घरगुती, आयुर्वेदिक उपाय आहेत.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.