गुरुपुष्यामृत योग : देवघरात ‘ही’ 1 वस्तू ठेवून पूजन करा, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, गर्भ श्रीमंती लाभेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो उद्या 25 ऑगस्ट रोजी गुरुवार आहे आणि या श्रावण महिन्यातील चौथ्या गुरूवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे सगळ्यात मोठा योग्य या दिवसाला मानले जाते. या दिवशी बरेच लोकं सोनं, चांदी खरेदी करतात किंवा जमिनी खरेदी करतात म्हणजे जे ही किमती वस्तू असतात त्याची खरीदारी केली जाते आणि अशी मान्यता आहे की, या दिवशी जी ही वस्तू आपण खरेदी करतो ती परत आपल्याकडून जाणार नाही. सोनं खरेदी केले, चांदी खरेदी केलं तर आपल्यावर अशी वेळ येणार नाही की, ते आपण परत विकू शकू. म्हणून या दिवसाची अशी मान्यता आहे की, या दिवशी हा लक्ष्मीचा योग जुळून येतो.

म्हणून मित्रांनो हा गुरूंचा योग म्हणून या दिवशी तुम्ही देवघरात ही एक वस्तू ठेवून त्या वस्तूचे पूजन केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. घरात लक्ष्मी येते घरात सुख-समृद्धी नांदते. आणि मग घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. मित्रांनो 25 ऑगस्टर या दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी ज्याही वेळेस तुम्हाला वेळ असेल त्या वेळेस तुम्ही देवघरात ही वस्तू ठेऊन त्या वस्तूचे पूजन नक्की करा आणि मित्रांनो ही वस्तू म्हणजेच श्री यंत्र. जे लक्ष्मीची यंत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. ते यंत्र जर तुमच्या देवघरात असेल तर तुम्ही त्यांचीच पूजा करायची आहे. जर देवघरात नसेल तिजोरीत असेल तर तिजोरीतून काढून त्याचे पूजन तुम्हाला करायचे आहे.

आणि तुमच्या घरात श्री यंत्र नसेल तर तुम्हाला एक नवीन श्री यंत्र घ्यायचे आहे आणि त्याचे पूजन तुम्हाला करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो या श्री यंत्राची पूजन करण्याची सोपी पद्धत आहे. सगळ्यात आधी श्री यंत्राला ते देवघरात असेल, तिजोरीत असेल किंवा नवीन आणला असेल त्याला तुम्ही स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्या धुवून घ्या. त्यानंतर श्री यंत्राला देवघरात स्थापन करा. हळद-कुंकू अक्षता टाकून त्याचे पूजन करा. अगरबत्ती, दिवा ओवाळा त्यानंतर प्रार्थना करा आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की, आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे, आमच्या घरात शांतता आरोग्य नांदू दे, आमच्या घरात बरकत राहू दे आणि आम्हाला आशीर्वाद दे, आमच्यावर कृपा कर अशी प्रार्थना करायचे आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर तुम्ही 25 ऑगस्ट गुरुवारी गुरुपुष्यामृत च्या मुहूर्तावर सकाळचे वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईलच आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील त्यामुळे तुमच्या घरांमध्ये पैशांसंबंधीत आणि त्याचबरोबर आरोग्य संबंधित कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत आणि त्याचबरोबर कायम घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील आणि सुख शांती टिकून राहील. मित्रांनो ही जी वर सेवा सांगितलेले आहे ही सेवा तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी म्हणजेच 25 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनो श्री यंत्र देवघरात ठेवून त्या श्री यंत्राचे पूजन नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *