संध्याकाळी ‘ही’ कामे केली तर घरात दुर्भाग्य येईल, सगळे वाईट होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनी आपल्या काही गोष्टी या धर्मशास्त्रानुसार न केल्यास अमान्य असतात, कारण त्या गोष्टी ठराविक वेळीच केल्याने त्यांचा लाभ होतो. आपल्या घरी माता लक्ष्मीचे आगमन व्हावे असे जर वाटत असेल तर या गोष्टी करण्यापासून वंचित रहा. कारण अशी कामे केल्यास माता लक्ष्मी क्रोधीत होते.

अशी काही कामे आहेत जी तुम्ही संध्याकाळी करू नका, अशी कामे सायंकाळी केल्याने लक्ष्मीचे वास्तव्य घरातून कायमचे निघून जाते आणि हिंदू धर्म, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम सकाळ-संध्याकाळ करायच्या आणि करू नयेत. आज आपण अशाच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या संध्याकाळच्या वेळी करण्यास मनाई आहे.

मित्रांनो ही कामे संध्याकाळी केली तर अनेक त्रास होतात. ते एखाद्या व्यक्तीला कंगाल बनवतात, त्याला पापाचा भागीदार बनवतात आणि सन्मानाचे नुकसान करतात आणि त्यामुळे ही कामे करू नये. सकाळ आणि सायंकाळ या प्रहरी काही ठराविक कामे ठरलेली आहेत, त्यामुळे तुम्ही ही कामे त्या त्या प्रहरातच करायला हवीत जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचा लाभ मिळेल.

प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरी अंगणात तुळस असतेच, देवपूजा, तुलसी पूजन हे सकाळी केलं जातं व सायंकाळी देवघरात, तुळशीत दिवा लावला जातो व प्रार्थना केली जाते.अशा प्रकारे तुम्ही रोज सायंकाळी हे काम केलं तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते, कारण सायंकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते व तिच्या भक्तांना आशीर्वाद देते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो हिंदू धर्मात कोणत्याही कार्याला करण्यासाठी वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाते. मग ती वेळ लग्नाची असो, पुजेची असो किंवा इतर कोणत्याही कामाची. शास्त्रांमध्ये सांगितले आहे, की एखाद्या कामाला योग्य वेळी केले तर त्याची रिझल्ट चांगला येतो. जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर येथे सांगण्यात आलेली कामे संध्याकाळी करु नका. संध्याकाळी जेव्हा मंदिरात किंवा इतर धार्मिक स्थाळांवर देवाची पुजा सुरू असते तेव्हा काही कामे करणे अशुभ मानले जाते. ही कामे संध्याकाळी केली तर घरात गरीबी येते. जास्त उत्पन्न असेल तरी पैसा हातात टिकत नाही. जाणून घ्या कोणती कामे संध्याकाळी करणे खराब समजले जाते.

मित्रांनो आपले धर्मशास्त्र असे मानते की शास्त्रानुसार तुळशीला विनाकारण स्पर्श करू नये, शास्त्र पध्दतीने कोणता उपाय, पूजा विधीसाठी जर तुळशीची पाने लागणार असतील तरच ती तोडावीत व तुळशीला स्पर्श करावा अन्यथा करू नये कारण मित्रांनो यामुळे माता तुळशी अप्रसन्न होते. तसेच जर तुम्ही विनाकारण तुळशीची पाने तोडत असाल, मंजुळा तोडत असाल तर माता तुमच्या वरती रुष्ट होते. यामुळे तुमचं भाग्य दुर्भाग्य बनते. आपल्या कामात अडथळे येतात व माता लक्ष्मीचा तो अपमान समजला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी म्हणजेच जेव्हा सूर्यास्त होत असतो, देवी माता लक्ष्मी घरात येत असते तेव्हा काही महिला घरी झाडू मारतात आणि घरामधे स्वच्छता करतात.

परंतु मित्रांनो यावेळी माता भूतलावरून भ्रमण करत असते व तिची प्रार्थना करणाऱ्या, वेळीच स्वच्छता ठेवणाऱ्या तिच्या भक्तांना आशीर्वाद देते. त्यासाठी लवकर झाडू मारावा आणि झाडू ला प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे हा तिचा अवमान समजला जातो म्हणून सायंकाळी झाडू मारण्याचे काम चुकूनही करू नये. त्यामुळे अलक्ष्मी घरात येते व घरातील सुख समृद्धी निघून जाते आणि मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट , काही घरांमध्ये स्त्रीयांचा वारंवार अपमान होतो, स्त्रियांना तुच्छतेने वागवले जाते, अपशब्द बोलले जातात, मारहाण केली जाते, स्त्रियांचा अपमान केला जातो तर माता लक्ष्मी अप्रसन्न होते व घरातून निघून जाते. त्यामुळे स्त्रियांना त्यांचा आदर सन्मान देणे आवश्यक आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.