स्वामींना गुरु न करता गुरु कसे मानावे? काय करावे?

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो स्वामीना गुरु न करून घेता त्यांना गुरु कसे मानावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंना आपला गुरु करून घेतो. ज्यांच्यावर आपली श्रद्धा आणि भक्ती असते. त्यांना आपण आपला गुरु करून घेतो गुरुपद घेत असतो. पण आपल्याला गुरु करून घेणे शक्य नसेल कारण गुरू करून घ्यायचे झाले तर त्याचे खूप नियम असतात.

आणि जे काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन आपल्याला करावेच लागते. आपल्याला जर गुरु करता आले नाही आणि न गुरू करता स्वामी समर्थ महाराजांना किंवा अन्य कोणत्याही कोणत्याही गुरूंना गुरु कसे मानावे. असे समजा की स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही सेवा करता पण स्वामी समर्थ महाराजांना आपण गुरु केलेले नाही. किंवा त्यांची गुरुपद घेतलेले नाही.

आणि स्वामींना गुरु कसे मानावे यासाठी कोणताही नियम किंवा कोणतेही बंधन नाही. कोणतीही सेवा नाही, कोणतीही भक्ती नाही. फक्त आपल्याला स्वामी समर्थ महाराज जसे सांगतील, त्या पद्धतीने वागावे लागणार आहे. आणि त्यावेळीच स्वामी समर्थ महाराज आपले गुरु होतील. आणि त्यावेळी तुम्ही त्यांचे सेवेकरी किंवा शिष्य होता. स्वामींचे ऐकावे लागेल.

यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी काय सांगितले आहे. तर आपले कर्म चांगले असायला हवे. सतत स्वामी समर्थ महाराजांची नामस्मरण करायला पाहिजे. थोर व्यक्तींचा तसेच आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींचा आदर करायला पाहिजे. त्यांचे मन दुखवायचे नाही त्यांना नाराज करायचे नाही. या सर्व गोष्टी जर आपण पाळल्या तर स्वामी समर्थ महाराज आपले गुरुच राहतात.

वरील लेखांमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींचे जर आपण पालन केले तर स्वामी समर्थ महाराजांना वेगळे गुरु करण्याची काही गरज नाही. त्यांना गुरु करण्याची कोणतीही विधी नाही. किंवा कोणत्याही गोष्टीचे होम हवन करावे लागत नाही. फक्त मनापासून कोणतीही गोष्ट केली के महाराज आपले गुरु होतात. त्या क्षणापासूनच स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानावे.

आजच आपण स्वामी समर्थ महाराजांना गुरु म्हणून मानले महाराज आज पासूनच तुम्ही माझे गुरु आहात. आणि तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे नियमांचे मी पालन करणार आहे. मी तुमचा शिष्य आहे. आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी मी मनापासून ऐकेन व त्या करेन. आणि तुम्ही मला ज्या पद्धतीने अज्ञात द्याल, त्या पद्धतीने मी वाघेन असे जर आपण केले तर स्वामी समर्थ महाराज आपले गुरु झाले आणि आपण त्यांचे शिष्य.

यासाठी आपल्याला फक्त स्वामी समर्थ महाराजांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. एखाद्याला जर आपली मदत हवी असेल तर त्या व्यक्तीला मदत करा. कोणाचाही आपल्याकडून अपमान होणार नाही. अशा पद्धतीने आपली वागणूक ठेवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांना फक्त चांगले कर्म आवडतात. त्यामुळे चांगले कर्म करत राहा.

आपल्याकडून जर वाईट कर्म झाले आणि आपली वागणूक सतत चुकीची आहे. आणि तरीदेखील आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असाल तर स्वामी समर्थ महाराज आपले कधीच गुरु होणार नाहीत. आणि तुम्ही जी काही स्वामींची सेवा करणार आहात किंवा करत आहात ती सेवा देखील स्वामींना आवडणार नाही.

चांगले कर्म करत राहा आणि चांगल्या कर्मा सोबत स्वामींची सेवा करा. स्वामींचे नामस्मरण करा. काही दिवसातच आपल्याला फरक जाणवेल. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतील. आपल्याला जे काही हवे आहे ते सर्व मिळेल. स्वामी समर्थ महाराजांना मनापासून गुरु माना स्वामी समर्थ महाराज आपले गुरु होतील. व आपण त्यांचे शिष्य.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *